घरात खायची मारामार तरी त्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला
कळमसरे येथील गणेश व्हलरची बांबू उडी राष्ट्रीय पातळीवर
आ.स्मिताताई वाघ यांनी केला गणेशचा सत्कार.
कळमसरे येथे गणेश व्हलरचा उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी ठेवला नागरी सत्कार.
अमळनेर(ईश्वर महाजन)
वडील आजारी त्यांच्याने काम होत नाही..... आई मजुरी करून कुटुंबाचा संसार भागवते ..... आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या भावांनी शिक्षण सोडले ... पाय पसरण्याइतपत इंदिरा आवास योजनेत मिळालेले झोपडी वजा घर तरी ही नशिबाला दोष न देता प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कळमसरे येथील रहिवासी व प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश रामदास व्हलर याने बांबू उडीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली
शालेय शिक्षण कलमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात झाले 5 वि पासून खेळात चुणूक दाखवत होता धावणे , खो खो , कबड्डी,उंच उडी मध्ये चमकू लागला म्हणून क्रीडा शिक्षक पावरा सर व डी डी राजपूत यांनी त्याला बांबू उडीत सराव करायला सांगितले शिक्षकांची प्रेरणा मिळाली परंतु बांबू उडी साठी स्टॅण्ड नाही , आडवा बार नाही बांबू नाही मॅट नाही अशाही परिस्थितीत शिक्षकांनी शक्कल लढवली उंच उडीच्या स्टँडला टोकर जोडून त्यांची उंची वाढवलीय त्या टोकराना खिले ठोकून त्यावर आडवा बार ठेवला , वेताचा बांबू आणला मॅट नव्हती म्हणून गावातून जुन्या गाद्या गोळा केल्या त्याच्यातील कापूस जमा करून गोंणपाटात एकत्र करून मॅट तयार केली आणि गणेश चा नियमित सराव सुरू झाला सुटी आली की गणेश लाही घरासाठी मजुरी करणे भाग पडत असे वडील दोन वर्षांपासून विहिरीत पडल्याने त्यांच्याकडून काम होत नाही दोघे भाऊ देखील मजुरी करतात अशा प्रतिकूल परिस्थितीत रडत न बसता नव्या उमेदीने गणेशने जिद्दीने सराव सुरू ठेवला 10 वि त असताना कुठल्याही तज्ज्ञाकडून मार्गदर्शन नाही ,तंत्रज्ञान अवगत नाही तरी शालेय स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला त्यावेळी त्याने इतरांचे निरीक्षण करून झालेली चूक सुधारली अन 11 वि ला प्रताप महाविद्यालयाकडून खेळताना राज्यात पहिला क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली विशेष म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेत 3 मीटर उंचीची पात्रता होती तोच पारंपरिक बांबू , पायात बूट नाहीत तरी गणेश एकमेव स्पर्धक ज्याने पात्रता उंची पार केली इतर स्पर्धक पात्रता उंची पेक्षा 10 से मी ने मागे राहिले कळमसरे , प्रताप महाविद्यालय सह अमळनेर तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचले
गणेश ला यापुढे आधुनिक फायबर बांबूची आवश्यकता आहे , त्याला बुटांवर सराव आवश्यक आहे मात्र बांबूचीच किंमत 20 ते 40 हजार आहे , त्याला आधुनिक तंत्रज्ञान व मार्गदर्शनाची गरज आहे गणेश अजून प्रगती करेल आमदार स्मिता वाघ यांनी व खान्देश शिक्षण मंडळाने त्याचा सत्कार केला आमदार वाघ यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्याशी चर्चा करून गणेश ला आधुनिक फायबर बांबू , साहित्य व शिबिर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे गरिबीच्या परिस्थितीवर मात करत गणेशने मिळवलेल्या यशाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे
आ.स्मिता वाघ यांनी त्याचे व शिक्षक डि.डि.राजपूत यांचे अभिनंदन केले.व भावीवाटचालीस शुभेच्छा देऊन आपल्या स्तरावर सर्वातोपरी मदत करू असे सांगितले.
आज कळमसरे येधील उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी गणेशचा जाहिर सत्कार ठेवला आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.