*महाराष्ट्र माळी समाज महासंघ राज्य संघटक पदि प्रवीण महाजन*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
* महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या राज्यस्तरीय महा जनरल बैठक नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली यावेळी महाराष्ट्रातून पदाधिकारी उपस्थित होते सर्वांच्या संमतीने ठराव होऊन क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रमुख प्रविण बी.महाजन यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघ राज्याच्या संघटक पदी प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन व सर्व विश्वस्थांनी मिळून निवड केली महासंघाच्या व महात्मा फुले विचार मंच मार्फत विविध सामाजिक कार्येक्रम मेळावे घेणे वधु वर परिचय मेळावे,पालक परिचय मेळावे,महिला सम्मान मेळावे,जिल्ह्यात शाखांचे उदघाटन करणे,विनामूल्य माळी समाज सूचक केंद्र चालवणे अंध,अपंग विवाह इच्छुकांचे विवाह जुळवून आणणे,गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करणे, युवकांना व्यापार क्षेत्राशी जोडणे, माळी समाज मंदिरांचे पूजन करून पूर्वजांच्या कार्यास उजळणी देणे,सकल माळी समाजाचे कार्ये व उत्कृष्ट समाज संघटन लक्षात घेता सदर निवड करण्यात आली आहे सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल त्यांना राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व राज्य पदाधिकारी,विविध आघाड्यांचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी समाज बांधव युवक बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी पोलीस बंदोबस्त चोक ठेवण्यात आला होता. या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे*