कळमसरेच्या गणेशने मिळवले राज्यस्तरीय ऑथलेटिक्स स्पर्धत सुवर्णपदक------ राष्ट्रीय स्पध्येसाठी बांबूउडीत निवड-------
आ.स्मिताताई वाघ यांनी केला गणेशचा सत्कार.
आज माजी सरपंच मुरलीधर महाजन कळमसरे येथे करणार त्याचा जाहिर सत्कार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
येथील गणेश व्हलर या विद्यार्थ्याने गरीबीच्या परिस्थितिवर मात करीत तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,विभागीय, व राज्यस्तरीय स्पर्धयेत मजल दर मजल मारीत नुकतेच राज्यस्तरीय एथेलेटिक्स स्पर्धत त्याने बांबू उड़ीत सतरा वर्षाअतिल गटात सुवर्णपदक मिळूवुन त्याची राष्ट्रीय स्पर्धसाठी राज्य संघात निवड करण्यात आली आहे.
गणेश हा सध्यस्थितित प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असुन त्याला महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे. कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात पाचव्या इयत्तेत असतानाच त्याच्यातील मैदानी खेळाची चुनुक त्यावेळी क्रीडा शिक्षक डी डी राजपूत ,सुरेश पावरा यांनी पाहत त्याला बांबू उडीचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती.
शिक्षण घेत असताना गणेश हा नाशिक विभागीय स्तरावर त्याने यश मिळविले होते.तो आत्ता इयत्ता अकरावीच्या कला शाखेत शिक्षण घेत आहे.सुरुवातीपासून त्याला क्रीडा शिक्षक डी डी राजपूत,सुरेश पावरा या शिक्षकानी सर्वतोपरी मदत करून त्याला या यशापर्यंत आणले असून त्याची आत्ता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धयत निवड झाली आहे. त्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सत्कार व कौतुक होत असले तरी त्याची खरी गरज ओळखून त्याच्या या पुढील वाटचालीस आर्थिक रकमेचीही गरज आहे.मात्र त्याची परिस्थिती खूपच बेताची असल्याने त्याचे कौतुक करीत असताना त्याला पुढील यशासाठी आधुनिक क्रिडा साहित्य, त्याच्या पायात टुटलेले बूट अंगावर असलेले कपडे याची गरज भागवून त्याला पुढील स्पधेत सशक्त करण्यासाठी तालुक्यातील दात्यानी पुढे येऊन मदत केल्यास नक्कीच गणेश हा कळमसरे गावासह तालुक्याचे नाव तो राष्ट्रीय पातळीवर नेल्याशिवाय राहणार नाही.
आज कळमसरेत गणेशचा नागरी सत्कार----
गावातील ग्रामपंचायत सरपंच व उपसंरपंच,सदस्य, शिक्षणप्रेमी यांची राहणार उपस्थिती.
फोटो
उत्कृष्ट खेडाळू गणेश व्हलर याचा सत्कार करतांना आ.स्मिता वाघ,उपक्रमशील शिक्षक डि.डि.राजपूत, तालुका क्रिडाशिक्षक वाघ सर
छाया ईश्वर महाजन अमळनेर
गणेश व्हलर याने मिळवलेल्या या उतुंग यशामुळे उद्या ता.21 रोजी त्याचा सत्काराचा कार्यक्रम भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस मुरलीधर महाजन यांनी आयोजीत केला आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,आमदार स्मिता वाघ .सरपंच कल्पना पवार, प्रफुल्ल पाटील ,कविता पवार,शितल देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.त्याच्या या यशामुळे परिवारासह गावाचे नाव मोठे केल्याने गावात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. कळमसरे गावाचे विकासरत्न, उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी आतापर्यंत अनेक विकासकामे केली असून गावातील अनेक गुणवंत विद्यार्थी, शिक्षक,शेतकरी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करून प्रेरणादायी उपक्रम घडवून आणीत असतात.