निभोंरा हायस्कुलचे शिक्षक एन.आर.चौधरी उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी-माध्यमिक विदयालय निभोंरा ता.अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षक एन.आर.चौधरी यांना सरदार पटेल बहुउद्देशिय संस्था तर्फ जळगांव येथे उपक्रमशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आयोजक विष्णू भंगाळे,शामकांत वाणी यांनी कार्यक्लमाचे आयोजन करून चाळीस शिक्षकांचा सन्मान केला. ना.गुलाबराव पाटील यांनी पुरस्कारथी बांधवाची आता जबाबदारी वाढली असून अधिक जोमाने अध्यापन करूण विदयार्थीची गुणवत्ता वाढवावी असे सांगितले.
एन.आर.चौधरी हे हिंदी विषयाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रम राबवीत असतात. वृक्षारोपण, गुणवत्तावाढ,सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम नेहमी करीत असतात. त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन जळगांव येथे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, आ.राजू भोळे,आ.चंद्रकांत सोनवणे, उपकुलगुरू माहुलीकर,बी.बी.पाटील, मुख्याध्यापक तुकाराम बोरोले,विलास नेरकर उपस्थित होते. एन आर.चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आले.
त्यांच्या यशाचे अभिनंदन मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष,व शाळेचे मुख्याध्यापक बी.एच.चौधरी व शिक्षक वर्ग,हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष दिपक पवार, व सदस्य .महाराष्ट्र पत्रकार संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन
पत्रकार उमेश काटे,जयेश काटे,युनियन बँकेचे शाखाव्यवस्थापक मयुर पाटील व मित्रपरीवार
यांनी अभिनंदन केले.