भिंत बोलू लागली , गणित सोडवू लागली
पोरा आवर्जून शाळेला चाल .....
मंगरूळ - येथील शाळेच्या गणित शिक्षकांचा नवोपक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गणित माझ्या नावडीचा असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील मंगरूळ येथील कै दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षकाने नवीन संकल्पना राबवून शाळेच्या भिंती बोलक्या करून गणिताची शाळा निर्माण केली आहे
शालेय जीवनात गणित विषय हा अनेकांना नकोसा वाटतो आणि त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्याचे गणित बिघडते गणिताविषयी आवड निर्माण व्हावी आणि तो सोपा कसा वाटेल यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक संजय पाटील यांनी स्वखर्चाने शाळेच्या वाल कम्पाउंड रंगवून त्यावर 5 वि ते 10 वि पर्यंतच्या अभ्यासक्रमातील सूत्रे , आकृत्या , नियम विविध रंगात साकारल्याने येता जाता विद्यार्थ्यांच्या नजरेस पडणार आहे सर्वसाधारणपणे विद्यार्थी शाळेत येताना , घरी जाताना आणि मैदानावर उत्सुक व आनंदी असतात याच वेळी कठीण विषयाचा अभ्यास नजरेस पडला तर तो अध्ययनस सोपा जातो आणि दृक्श्राव्य माध्यमाकडे विद्यार्थी आकर्षित होतात त्यामुळे संजय पाटील यांनी शाळेत येण्याच्या मार्गावर गणित साकारले आहे मैदानावर खेळत खेळत मुलांना गणिताचे आकलन होईल त्यावेळी मानसिकता आनंदी असल्याने अध्ययन चांगले होईल भिंतीवर कायमस्वरूपी ही चित्रे राहणार असल्याने समरूप व एकरूप मधील गोंधळ, कोनांचे प्रकार, त्रिकोणांचे प्रकार , त्रिज्या व्यास , परीघ , चौकोनाचे प्रकार, सारळव्याज , चक्रवाढ व्याज, अक्ष चरण , संख्यांचे प्रकार फरक, चिन्ह , क्षेत्रफळ, घनफळ, मापन , परिमाणे , त्रिकोणमिती नव्याने 10 वीला समाविष्ट असलेले व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित जी एस टी याविषयीचा संभ्रम दूर होणार आहे जी एस टी क्रमांक काय आहे तो कसा ओळखावा , वस्तू व सेवा कोड काय आहे हे देखील कळणार आहे या नवोपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे भविष्यात लोकसहभागातून एक गाव गणिताचे निर्माण करण्याचा प्रयत्न राहील असेही त्या शिक्षकानी सांगितले त्यांना या कामी चेअरमन अनिल अंबर पाटील , मुख्याध्यापक प्रकाश पाटील व इतर सर्व विषय शिक्षकांचे सहकार्य लाभले त्यांच्या या नवीन संकल्पनेची दखल घेऊन धनगर कर्मचारी महासंघाचे माजीजिल्हाध्यक्ष डि.ए.धनगर, व मंगरूळ शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील व शिक्षक यांनी गणित शिक्षक संजय पाटील यांचा सत्कार केला.
चौकट
सकारात्मक शिक्षेतून ज्ञान
शासनाने विद्यार्थ्यांना छडी देण्यास बंदी घातली आहे मात्र विद्यार्थ्यांना धावत जाऊन भिंतीवरील त्या क्रमांकाच्या खात्यात कोणते सूत्र आहे ते पाहून ये , चौकोनाचे प्रकार कोणते व किती मोजून ये अशी शिक्षा दिल्यास तो आनंदाने शिक्षा स्वीकारेल आणि त्यातून तो गणित कायमस्वरूपी स्मरणात ठेवेल ----- संजय पाटील , गणित शिक्षक ,मंगरूळ
संभाव्य हेडिंग
एक शाळा गणिताची , शाळेची भिंत सुत्रांची
येता जाता खेळता खेळता गणित शिका
मंगरूळ शाळेचा अभिनव उपक्रम
शिक्षकांच्या संकलपनेतून भिंती गणित बोलू लागल्या
गणित सोपे करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग
फोटो
मंगरूळ शाळेत गणित शिक्षक संजय पाटील यांच्यामुळे भिंती बोलू लागल्या.
छाया ईश्वर महाजन अमळनेर.