Halloween party ideas 2015

गणपती बाप्पा  मुर्ती खरेदीला मंदीचा,व महागाईचा फटका
अमळनेर प्रतिनिधी-अवध्या दोन तीन दिवसावर आलेल्या गणरायाच्या आगमनासाठी बालकापासून ते जेष्टापर्यत सर्वच सज्ज झाले आहेत मात्र बाजारात गणपती स्टाँलवर मंदी दिसत आहे. वाढती महागाई, कर,रंगकाम, पीओपी,वाहतूक यामुळे मुर्तीची किंमतीमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.
   वरूण राजाच्या हुलकावणीमुळे शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम वाया जाणार असून उत्पादनात मोठी घट होणार आहे.त्यामुळे त्याचा परीणाम बाजारातील खरेदी विक्रीवर झाला आहे.गणपती मुर्तीचे दुकानदारांनी अनेक स्टाल लावले आहेत .परंतु नागरीकामध्ये उत्साह असला तरी पैसा नसल्याने मंदी दिसत आहे. गुरुवारी गणेशोत्सव सुरू होत असल्याने त्याच दिवशी गणेशभक्त मुर्ती घेतील असा विश्वास दुकानदारामध्ये आहे.
       स्वामी समर्थ गणपती मुर्ती स्टाँलचे मालक गणेश बेंद्रे यांनी सांगितले कि यावर्षी रंगकाम वाहतुक यामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे गणपतीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.सध्या आमच्याकडे दहा टक्के बुक झाले आहेत. सध्या मंदीचे वातावरण आहे.
यावेळी कैलास बेंद्रे, चेतन महाजन,राकेश देशमुख, मुकुंदा महाजन उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.