देवगांव देवळी हायस्कुलमध्ये वृक्षारोपण
देवगांव देवळी हायस्कुलमध्ये वृक्षारोपण
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये शासनाच्या धोरणानुसार वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेच्या परीसरात वृक्षारोपण दस्केबर्डी शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.बोरसे,समाजसेवक काशिनाथ चौधरी प्रमुख पाहुणे होते.तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मान्यवरांचे स्वागत केले.वृक्षारोपण हे शासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असले तरी झाडाचे संगोपन हि मोठी जबाबदारी आहे ती प्रत्येकाने प्रामाणिक पार पाडली पाहिजे. शाळेच्या कर्मचारी वर्ग जसे आपले हक्काची जाणीव ठेवतो तसे कर्तव्य विसरता कामा नये असे दस्केबर्डी शाळेचे मुख्याध्यापक डि.पी.बोरसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी पालक नाना महाजन,शिक्षक एच.ओ.माळी, आय.आर महाजन,एस.के.महाजन,अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील उपस्थित होते.