✒ *पत्रकार आमदार च्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन*
✒ *महाराष्ट्र पत्रकार संघ आज शासनाला व लोकप्रतिनिधीना देणार निवेदने*
✒ *पत्रकार आमदार च्या मागणीला सर्वच स्तरातून मिळतोय जाहीर पाठींबा*
----------------------------------------------------------
*मुंबई (प्रतिनिधी) पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ निर्मिती करून पत्रकार आमदार च्या मागणी करण्याबाबत महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे आज महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येणार असून आज पत्रकार संघातर्फे सर्वच पदाधिकारी पत्रकार बांधव स्थानिक सन्माननीय तहसिलदार प्रांत जिल्हाधिकारी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री महोदयांना पत्रकार आमदार मागणीचे प्रत्यक्ष भेट घेऊन अथवा मेलद्वारे व्हाटसअपव्दारे अन्य माध्यमातून निवेदन सादर करणार आहेत पत्रकार संघाच्या या मागणीला सर्वच स्तरातून तसेच विविध पत्रकार संघटनाकडून जाहीर पाठींबा मिळत आहे*
*ज्याप्रमाने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांचे राखीव मतदार संघ, शिक्षक आमदार आहेत, पदविधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधर मतदार संघ, पदवीधर आमदार आहेत त्याच धर्तीवर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी "पत्रकारांचाही स्वतंत्र मतदार संघ व पत्रकारांचा आमदार असला पाहिजे" अशी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आग्रही मागणी करण्यात येत आहे*
*सत्तेशिवाय सेवा करणारा व संरक्षणाशिवाय लढाई करणारा घटक म्हणजे पत्रकार होय पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकार स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वृतसंकलन करतोच शिवाय त्यांच्याही अनेक प्रलंबित व न्याय मागण्या आहेत.त्या सोडविण्यासाठी व प्रगल्भ लोकशाही निर्माण होण्यासाठी आणि पत्रकारांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा यासाठीच पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ व्हावा यासाठी येणा-या जुलै २०१८ पासुन सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याचे व त्या दृष्टीने पाऊल उचलण्याचे निवेदन आज राज्यभर सर्वत्र देण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे*