पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ असावा
महाराष्ट्र पत्रकार संघाचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी-पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांचाही राखीव मतदार संघ असलाच पाहीजे अशी आग्रहाची मागणीचे निवेदन संपुर्ण महाराष्ट्रभर पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना देण्यात आली.
अमळनेर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे निवेदन आ.शिरीष चौधरी यांच्या कार्यालयात देण्यात आले.आ.चौधरीच्या वतीने त्यांचे सहाय्यक गुलाबराव आगळे यांनी स्विकारले. तर तहसीलदार प्रदीपजी पाटील यांनाही देण्यात आले.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकार स्वताची जीवाची पर्वा न करता वृत्तसंकलन करतो.त्यांच्या अनेक न्याय मागण्या प्रलंबित आहेत त्या सोडण्यासाठी व प्रगल्भ लोकशाही निर्माण होण्यासाठी आणि पत्रकारांचा हक्कांचा लोकप्रतिनिधी, विधानपरिषद सदस्य असावा यासाठीच पत्रकारांचा स्वतंत्र राखीव मतदार संघ व्हावा यासाठी जुलै २०१८ पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करूण धसास लावावा यासाठी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री व स्थानिक आमदार आ.शिरीष चौधरी, आ.स्मिता वाघ यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहेत.
यावेळी पत्रकार संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी, जिल्हाकार्यकारणी सदस्य विजय पाटील, भुषण चौधरी सल्लागार
, गं का.सोनवणे,विजय सुतार, पकंज लोहार उपस्थित होते.