Halloween party ideas 2015

*माजी आमदार साहेबराव पाटलांनी सोडवला विप्रो बोगदयाचा प्रश्न*

शाळकरी मुलासह पालकांनी मानले आभार.

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विप्रो बोगदयाचा प्रश्न बर्याच दिवसापासून रेंगाळत पडलेला होता.पावसाळ्यात बोगदयाचा खाली पाणी असल्यामुळे शाळकरी मुले,नागरिकांना जाणे दुरापास्त होते. मागच्या वर्षी दोन तरूणांचा मुत्यु झाला होता.याबाबत नागरिकांनी नगरपालीकेला निवेदन दिली होती. परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही. माजी आमदार साहेबराव पाटील ,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी हा प्रश्न सोडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

६० वर्षात कुणालाच नाही जमले

दरवर्षी बोगद्याखाली पाणी तुंबले

न.पा.कर्मचारी पाणी फेकुन दमले

नागरीकांचे रोजचे काम खोळंबले

 विद्यार्थ्यांनी शाळेचे तास बुडविले

नागरीकांस विप्रो बोगद्याने रडवले

बाजुच्या गटारीने तर कहरच केले निष्पाप नागरीकांचे  जीवच  नेले

कित्येक लोकांचे त्यात प्राण गेले

हे अनर्थ *विप्रो बोगद्याने केले* हे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिले.त्यांनीही सहकार्य दाखवले व ररत्यातील खांबे बाजूला केले. रस्ता व गटारीचे नवीन काम केले. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे सोपे झाले. बोगदयाचा खाली पाणी न साचता गटारीतून वाहुन जात आहे. त्यामुळे तांबेपुरा भागातील नागरिकांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला गेला त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी आभार मानले आहेत.

   अमळनेर तालुक्यातीचे माजी आमदार साहेबराव पाटील समस्या कोणतीही असो ती सोडवल्याशिवाय शांत बसत नाही.

फोटो

अमळनेर येथील हाच तो विप्रोचा बोगदा पावसाळ्यात नागरिकांना समस्याला सामोरे जावे लागायचे.

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.