Halloween party ideas 2015

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन

अमळनेर्   येथिल बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने अमळनेर तहसील कार्यालयात तहसिलदार प्रदिप पाटिल यांना निवेदन देत राज्यात बहुजन समाजातील लोकांवर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत दोषींवर कठोर कार्यवाही होणेसाठी एकदिवसीय निवेदन आंदोलन करण्यात आले.

          बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने राज्यभर सर्व तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयावर ३०जून ला एकदिवसीय धरणे आंदोलन व निवेदन आंदोलन कार्यक्रम  राबविण्यात आला. याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका प्रभारी प्रा.जितेंश संदानशिव, तालुका समन्वयक रणजित शिंदे , तालुका संयोजक किरण मोहिते,कमलाकर संदनशिव, जिल्हा पदाधिकारी राजेश मोरे, विजय गाडे,आदिंनी तहसीलदार प्रदिप पाटिल यांच्याशी मागण्यांबाबत माहिती देत चर्चा केली यावेळी अड.शिवकुमार ससाणे, शिक्षक संघटनेचे संजय पाटिल, जितेंद्र ठाकूर, अल्पसंख्याक पदाधिकारी आरिफ भाया,सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटिल, सुधाकर बिऱ्हाडे, शशांक संदानशिव, पत्रकार सत्तार खान,प्रविण जगन्नाथ पाटिल आदिंच्या प्रमुख उपस्थितीत दिलेल्या  निवेदनात वाकडी ता. जामनेर येथिल  मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून झालेली मारझोड ,रुद्रावाडी उदगीर,जि. लातूर येथील मातंग समाजाच्या कुटुंबियांना झालेली मारहाण यातील दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी.

जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या प्राचिन लेणी तपोभूमी स्मारक,भामचंद्र भंडारा येथिल तपोभूमी राज्य संरक्षित  स्मारक करण्यात यावे व त्याभोवतालचे ,डोंगरपरिसरातील भूमाफियांचे अतिक्रमण हटविण्यात यावे .

नारायणगाव पुणे येथे कैकाडी समाजावर गुंडांकरवी भ्याड हल्ला करून उपजीविकेचे साधन नष्ट केली गेलीत,अहमदपूर,जि. लातूर येथिल कोमल आनंद पवार या वडार जातीच्या मुलीवर अत्याचार करून खून करनाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना   त्वरित कठोर शासन झाले पाहिजे.भिमा कोरेगाव दंगलीचे फिर्यादी,पोलीस पाटिल, पोलिस कर्मचारी यांचेवर  खोटे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी चौकशी आयोग दबाव आणून दंगलीचे सूत्रधार भिडे,एकबोटे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.चौंडी जामखेड येथे धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांवर दाखल खोटेगुन्हे मागे घेण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी. अश्या मागण्यांचा समावेश आहे.सदर निवेदनावर संतोष पाटिल, के.एच.कदम, जुबेर कुरेशी, तौसिफ कुरेशी, मानसिंग भिल,सुनिल बिऱ्हाडे, कैलास केदा, भुपेंद्र पाटिल, सुनिल बिऱ्हाडे, स्वाती पवार आदिंच्या स्वाक्षरी होत्या.

फोटो

बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने तहसिलदार प्रदिप पाटिल यांना निवेदन देतांना बहुजन क्रांती मोर्चा समन्वयक रणजित शिंदे,कमलाकर संदानशिव,प्रा.जितेश संदानशिव,किरण मोहिते,आरिफ भाया, विश्वास,विजय गाडे आदि

छाया-ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.