अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रेरणादायी यशोगाथा*
अमळनेर तालुक्यातील खेडी( अमळगाव) येथील रहिवासी या प्रताप महाविद्यालय अमळनेरचा विद्यार्थी भुषण भाऊराव पाटील लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत 340 पैकी 242 मार्क्स मिळवून ओबीसी संवर्गातून 18 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याची ही यशोगाथा.
भुषणचे वडील भाऊराव पाटील पस्तीस वर्षांपासून गावातच सालदारकी करतात तर त्याची आई....शेतमजुरी करते आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे घर देखील खूप साधे व खूप लहान आहे स्वभावाने लहानपणापासून तो खूप शांत आहे .शालेय शिक्षण पूर्ण करीत असताना घरातील परिस्थिती सारखी अडचणीची ठरत होती दहावीत चांगल्या मार्कनी उत्तीर्ण झालेल्या भुषणणे जळगावला शासकीय इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला त्यातही यशस्वी झाला चांगल्या गुणांमुळे त्याचा पुण्याच्या सीओईपी सारख्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला त्याला प्रवेश मिळाला परंतु पुण्यात राहून शिक्षण घेणे त्याच्या आर्थिक परिस्थिती नुसार परवडणारे नव्हते म्हणून त्याने इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्रवेश रद्द केला व सरळ अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेऊन पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले ते करत असताना त्याने प्रताप महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागात प्रा एस ओ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा तयारी सुरू केली सतत तीन वर्षे खूप मेहनत घेतली आणि पीएसआय परीक्षेत यश संपादन केले. मनापासून केलेलं कोणतंही काम यश नक्की देत यावर भुषणचा खूप विश्वास आहे आईवडीलांनी केलेले कष्ट व परिस्थितीशी केलेला संघर्ष सतत डोळ्यापुढे ठेवला त्यांची तळमळ पाहून झोप सुद्धा येत नव्हती स्वतः मनाशी निश्चय केला की काही तरी पद मिळविल्याशिवाय शांत बसायचं नाही कारण मी नोकरीला लागलो तरच माझं घर पुढे चालेल कोणताही पर्याय नव्हता कधी कधी एसटी पाससाठी पैसा नसायचा प्रसंगी कॉलेज बुडायचं पण हिम्मत सोडली नाही ध्येय फक्त एकच होत काही तरी मिळवायचंच त्याच्या या प्रवासात दिलीप शिरसाठ अजय कोळी शरद सैंदाणे आईवडील ,बहीण मेहुणे मामा गणेश पाटील तसेच गावातील वाचनालयाचे अध्यक्ष श्याम पवार राजेंद्र पवार किसन पाटील शांताराम पाटील दीपक पाटील निलेश पाटील यांची मोलाची साथ मिळाली .पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात तो तरुणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करतो.
अमळनेर तालुक्यात त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.