Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर पासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वावडे येथील प्रविण सुरेश भिल या दहावीच्या विदयार्थांचा मुत्यु झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.शुक्रवारी दुपारी वावडे ता.अमळनेर येथे हि घटना घडली. प्रविण हा पालकाबरोबर सकाळी कपाशी लावण्यासाठी गेला होता तालुक्यात काही भागात चांगला पाऊस पडल्याने वडील व मुलगा परत येत होता.यावेळी मुडी वावडे ररत्याला लागून एका शेततळ्यात त्याचा पाय घसरला यावेळी वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी खुप प्रयत्न केले त्यात तो बुडाला . याबाबतीत माहिती मिळताच पंचायत समितीचे सभापती वजाबाई भिल यांनी तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्यांचे शवविच्छेदन करूण नातेवाईकांच्या ताब्यात दिले.मारवड पोलीसात आकास्मिक मुत्युची नोंद करण्यात आली आहे.गावात त्यांच्या मुत्युमुळे शोककळा पसरली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.