Halloween party ideas 2015

             पाथरी येथील तहसिलदार यांना धमकी देणाऱ्या विलास तांगडे याला अटक करा.

उपविभागीय अधिकार्यांना पारधी समाजाचे निवेदन.

  अमळनेर प्रतिनिधी-

        परभणी जिल्हायातील  पाथरीचे तहसिलदार वासुदेव शिंदे यांना विलास तांगडे यांनी १२ जून रोजी भ्रमणध्वनीवरून धमकी देवून अपमानास्पद वागणूक दिली.महाराष्ट्रात  वाळू तस्कर व लोकप्रतिनिधी मार्फत शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यावर हल्ले होत असतात .तसेच त्यांच्या कडून चुकीचे काम करून घेण्यासाठी राजकीय दबाव तसेच वेळप्रसंगी  वरदहस्त व मसलपावर यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो .

    त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कर्तव्य पार पाडतांना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. शासनाच्या दोन भुमिका आहेत ,एक आहे नियामक भूमिका म्हणजेच नियमांच्या चौकटीत जनतेला शिस्त लावण्याची आणि दुसरी जनकल्याणाची. पण या दोन्हीही भुमिका पार पाडतांना विलास तांगडे यांच्या सारख्या लोकांकडून  अडचण निर्माण होत असते .  त्यामुळे त्यांना नियामक भुमिकेतून शासनाच्या नियमांची आठवण करून देणे गरजेचे झाले आहे. त्यांच्यावर शासन नियमांनुसार कारवाई करणे आवश्यक  आहे. त्याशिवाय जनतेते शासनाच्या शिस्तीचा वचक रहाणे अवघडच  आहे असे आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांना दिसून येत  आहे . शासनाचा वचक जनतेत न राहिल्याने अमळनेर तालुक्यात मागील काही दिवसात बोकाळलेली  गुन्हेगारी आपण स्वतःच  पाहिली आहे.शासनाचा वचक जनतेत राहिल्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखणे  अशक्य झाले आहे.

पाथरी येथील तहसीलदार वासुदेव शिंदे हे आदिवासी जमातीतील पारधी समाजाचे असून त्यांचे वय आत्ता वय वर्ष ५८ आहे व ते ऑक्टो २०१८ मध्ये सेवानिवृत्त देखील होणार आहेत एकंदरीत त्यांचा अनुभव अनेक वर्ष प्रशासनाची व समाजाची केलेली सेवा पाहता त्यांच्यावरील अन्याय निषेधार्थ आहे.अनुसूचित पारधी समाज जमातीतील खूप कामी अधिकारी किंवा उच्च पदस्त व्यक्ती कार्यरत आहे.आणि वरील पद्धतीने जर त्यांच्यावर दबाव तसेच धमकी मिळत असेल तर त्यांनी त्यांचे कार्य सेवा कशी करावी असा प्रश्न उपस्थित होतात.

 

             वरील सर्व कथनावरून आपले लक्षात आले असेल की,विलास तांगडे याला त्वरित व तात्काळ अटक करून त्याच्यावर शासन नियमानुसार गुन्हे दाखल करणे किती गरजेचे आहे.तसेच त्यांनी भूतकाळात देखिल असे गुन्हे केले असतील याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत  त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. शासकीय कर्तव्य पार पाडतांना  भयमुक्त अधिकारी/कर्मचारी असे वातावरण समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.  

    तहसीलदार वासुदेव शिंदे यांना न्याय न मिळाल्यास आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट प्रदेश संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन छेडेल याची कृपया नोंद घ्यावी.

फोटो.

निवेदन देताना *आदिवासी पारधी महासंघाच्या महिला प्रदेशध्यक्षा- प्रा.जयश्री साळुंखे,*

गणेश चव्हाण, शिवाजी पारधी,प्रा विजय गाढे सर,सुनील करंदीकर,भास्कर पारधी,  गोरखनाथ पारधी, आप्पा दाभाडे, अशोक पवार,संजय पारधी,मनोज पारधी, संजय मरसाळे, सुरेश कांबळे, सत्तार खान, अजय भांमरे, बाळासाहेब सोनवणे, पंडित गायकवाड, गोरखनाथ पारधी, बबलू पारधी आकाश दाभाडे आदी उपस्थिति होते

फोटो

ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.