अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर- इयत्ता ८ वि ते १० वि वर्गावर गणित विषयाच्या आठवड्याला तासिका वाढवण्यात याव्यात अशी मागणी अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ व गणित मंडळातर्फे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे करण्यात आली
गेल्या वर्षभरापासून ८ वि ते १०वि गणित विषयांच्या अभ्यास क्रमात बदल करण्यात आला असून कृतीयुक्त शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे त्यामुळे गणित शिकवायला जादा वेळ लागतो प्रसंगी जादा तासिका घ्याव्या लागतात मात्र त्याचा कार्यभार धरला जात नाही तसेच नव्याने क्यू आर कोड च्या माध्यमातून अतिरिक्त ज्ञानासाठी कोड स्कॅन करून भ्रमणध्वनी च्या माध्यमातून अध्यापन करावयाचे झाल्यास अधिक वेळ लागणार आहे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी हा विषय कठीण व वेळखाऊ आहे त्यामुळे या विषयासाठी जादा तासिका असणे आवश्यक आहे मात्र सध्याच्या स्थितीत आठवड्यात फक्त ७ तासिका असून त्याऐवजी ८ तासिका असाव्यात अशी मागणी अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील (मंगरूळ हायस्कूल)व तालुका गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डी ए धनगर (सानेगुरुजी हायस्कूल)यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
फोटो
गणित विषयाचे तास वाढवा अशा आशयाचे निवेदन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना देतांना माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, गणित मंडळाचे अध्यक्ष डि.ए.धनगर सर
छाया ईश्वर महाजन अमळनेर