Halloween party ideas 2015

' वाचन प्रेरणा दिवस ' साजरा ---!
'शास्त्र आणि शास्त्रज्ञच 'जगाला
करतील सुज्ञ-- पी. एम. ठाकरे
अमळनेर येथील इंदिरा विद्या मंदिर शाळेत भारतरत्न डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन 'म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला उपक्रमशील शिक्षक पी. एम. ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर ठाकरे यांनी आपले विचार कथन करतांना सांगितले की, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे " तुम्ही झोपेत पाहतात ती स्वप्न नसतात, स्वप्न तिच असतात जी तुम्हाला झोपुच देत नाहीत ! " आपले आयुष्य एक शाळाच आहे, तिथं आपण कायम स्वरूपी विध्यार्थीच असतो " म्हणून आपण नेहमी वाचन केले पाहिजे ! कारण वाचन हे मनाचे अन्न आहे त्यामुळे वाचाल तर वाचाल ! आणि वाचाल तर आपली वाचा सुधारेल , वाचा सुधारली तर आपल्या जीवनाचा योग्य साचा तयार होईल, आणि साचा तयार झाला तर आपल्या भविष्याचा उज्ज्वल ढाचा तयार होऊन आपले जीवन आनंदीमय होईल !
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. त्यांनी आपल्या जीवनात 'शिक्षण आणि वाचन' यांनाच महत्त्व दिले होते. पुढे त्यांनी क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला अग्नी या क्षेपणाश्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांना जगभरातून कौतुक आणि प्रसिद्धी मिळाली. पाच अग्निबाण चाचणीमूळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रपती भवनावर ते प्रथम शास्त्रज्ञ म्हणून देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी विराजमान झाले होते. त्यांनी त्रिशूल, पृथ्वी, अग्नी,आकाश आणि नाग या अग्निबाणांची निर्मिती केली होती . त्यामुळे त्यांना भारत सरकारने पदमभूषण , पद्मविभूषण आणि सर्वोच्च भारतरत्न 'किताब देऊन गौरविण्यात आले होते.
27 जुलै 2015 रोजी शिलॉंग भारतीय व्यवस्थापन शास्त्र यावर ' पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे ' यावर व्याख्यान झाले आणि तेच त्यांच्या जीवनातील अखेरचे व्याख्यान ठरले. सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार ,पर्यवेक्षक डी. एन.पाटील, व्ही. डी. पाटील, प्रमोद पाटील,रविंद्र चौधरी, बी. एस. चव्हाण मॅडम, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. सोनवणे यांनी केले. आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अशोक सैंदाने, शिवाजी पाटील, रविंद्र चौधरी आदींनी सहकार्य केले .


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.