Halloween party ideas 2015


*महात्मा फुले ब्रिगेड तर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार*

जळगाव जिल्ह्यात महात्मा फुले ब्रिगेड विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहे जळगाव जिल्हयातील जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार महात्मा फुले ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन यांच्या नेतृत्वात केला, यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भिकन महाजन यांनी राऊत यांना महात्मा फुले ब्रिगेड चे जिल्ह्यात सामाजिक कार्यातील योगदान व पुढील नियोजनाबाबत सांगितले व विविध विषयांवर चर्चा यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सोबत करण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुनील देवरे,जिल्हा संपर्क प्रमुख भीकन महाजन,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शितल महाजन,जिल्हा कोष्याध्यक्ष सचिन माळी, जळगाव शहर अध्यक्षा संगीता महाजन,जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख डॉ अजय माळी,उपस्थित होते


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.