Halloween party ideas 2015

पद्मश्री पोपटराव पवार यांचे आज ऑनलाईन मार्गदर्शन.
एरंडोल दिनांक १९.
शाळा सिद्धि निर्धारक समूहाचे राज्य स्तरीय समुपदेशक तथा प्रशिक्षक आसिफ शेख यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण संवाद उपक्रमांतर्गत शालेय पिण्याच्या पाण्याचे महत्व व व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय सर्वांसाठी ऑनलाईन झूम मीटिंग वेबिनार चे आयोजन शाळा सिद्धि निर्धारक समूह महाराष्ट्र आणि एहसास फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक चर्चासत्र शिक्षण संवाद राज्यस्तरीय उपक्रम मालिकेत आज पद्मश्री पोपटराव पवार सरपंच आदर्श गाव हिवरे बाजार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्य सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आज पद्मश्री पोपटराव पवार मार्गदर्शन करणार असून पिण्याच्या पाण्याची यशोगाथा शालेय पिण्याचे पाणी व्यवस्थापन व नियोजन बाबत या माध्यमातून राज्यातील सर्वांना खुला विनामूल्य  लाभ मिळणार आहे. झूम आयडी 75201896857, तसेच पासवर्ड986038 असून  राज्यातील सर्वांनी या अभिनव अनोख्या उपक्रमाचा  लाभ घ्यावा तसेच स्वच्छ महाराष्ट्र फेसबुक पेज वरून देखील सहभागी होत आज सोमवार दिनांक १९/१०/२०२०रोजी संध्याकाळी ७ते८ या वेळेत होणाऱ्या मालिकेचा लाभ घ्यावा असे  संयोजन समितीचे वतीने राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक तसेच शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महा सचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी कळविले आहे.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.