*पाकिजा* *पटेल* *यांना* *राष्ट्रपती* *अब्दुल* *कलाम* *शिक्षकरत्न* *पुरस्कार*
आदर्शगाव राजवड च्या आदर्श शिक्षिका राष्ट्रपती पदक विजेत्या पाकीजा उस्मान पटेल यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने दिला जाणारा मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा राष्ट्रपती अब्दुल कलाम शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला.
महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे संस्थापक बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
तसेच डॉक्टर ए. पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी के.जी.एन . सोशल सर्विस गुजरात तर्फे वर्ल्ड स्पेस टेक्नॉलॉजी अवार्ड पाकिजा पटेल यांना घोषित करण्यात आला.
या दोन्ही पुरस्कारामुळे राजवड गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारोळा गटशिक्षणाधिकारी ताईसो कविता सुर्वे मॅडम शिक्षण विस्ताराधिकारी अण्णासो सी.एम. चौधरी केंद्रप्रमुख दादासो भाईदास पारधी सर यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
