*प्रा डॉ रमेश माने यांना पीएच.डी चे मार्गदर्शक म्हणून मान्यता*
*अमळनेर : येथील प्रताप स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख तथा मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ रमेश माने यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून मराठी विषयासाठी एम.फील व पीएच.डी पदवीसाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता मिळाली आहे.प्रा डॉ रमेश माने यांनी मराठी विषयात नेट-सेट सह प्रसिध्द लेखिका उर्मिला पवार यांच्या साहित्यावर एम.फील तर लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव यांच्या साहित्यावर पीएच.डीचे संशोधन करून दोन्ही उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.शिवाय ते विविध वाङ्मयीन नियातकालिकांमध्ये काव्य व समीक्षालेखन करीत असतात.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू-भगिनींनी अभिनंदन केले आहे*
फोटो
मा माने सरांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, संयुक्त चिटणीस, विश्वस्त, व संचालक मंडळ पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर, महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर, महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी,ओबीसी शिक्षक परीषद जळगांव, दैनिक साईमत परीवार, मराठी लाईव्ह न्युज पोर्टल च्या वतीने मनापासून अभिनंदन! व भावीवाटचालीस शुभेच्छा!
💐💐💐💐💐💐💐💐
