Halloween party ideas 2015

शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या असंघटित कामगारांना अनुदान मिळण्याबाबत आमदारांना निवेदन.

प्रतिनिधी अमळनेर

तालुक्यातील शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या असंघटित कामगारांना अनुदान मिळण्याबाबत आमदारांना निवेदन देण्यात आले, अमळनेर मतदारसंघात तसेच महाराष्ट्र राज्यात शिंपी समाज मोठया संख्येने वास्तव्यास आहे. समाजाचा पिढीपरंपरागत मुख्य
व्यवसाय शिवणकाम व कापड व्यापार आहे. गेल्या काही दिवसांपासून रेडिमेड कपड्यांचे
प्रस्थ वाढल्यामुळे व मल्टीनॅशनल कंपन्यांच्या वाढत्या ऑनलाईन व्यवसायामुळे शिवणकाम
व्यवसायाला तसेच कापड व्यवसायाला घरघर लागली आहे. शिंपी समाजातील शिवणकाम
करणारा कारागीर हाताला काम नसल्याने आणि दुकानदार वर्गही आर्थिकदृष्टया अडचणीत आला आहे व त्यांची उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन शिवणकाम करणा-या कारागीरांना व असंघटीत कामगारांना देण्यात येत असलेले आर्थिक अनुदान त्वरीत मिळावे, तसेच शिंपी समाजातील
शिवणकाम कारागीर आणि दुकानदार यांच्या आर्थिक व उद्योग व्यवसाय विकासासाठी
संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ सारखे संत नामदेव शिवणकर्मी आर्थिक
विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.
या मागणीसाठी मुख्यमंत्री तसेच
संबंधित मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा आणि विधीमंडळाच्या दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आगामी अधिवेशनात यासंबंधीचा मुद्दा तारांकित प्रश्न अथवा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करुन आमच्या समाजास न्याय मिळवून द्यावा अशी या पत्राद्वारे शिंपी समाजातील सर्व शिवणकाम कारागीर आणि दुकानदार यांच्यावतीने विनंती करण्यात आली आहे.
यापूर्वी 26 एप्रिल 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदारांना यासंदर्भात निवेदन दिले होते व आपण तत्परतेने आपल्या पत्राव्दारे शिवणकाम कारागीरांचे ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. आपण कायमच शिंपी समाजाच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिला आहात. आपल्या कृतीशील पाठींब्यासाठी आभार व्यक्त करत शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या कारागीरांना असंघटीत कामगारांना देण्यात येणारे अनुदान मिळण्यासाठी विधीमंडळाच्या दिनांक 7 व 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात न्याय मिळवून द्यावे असे निवेदन समजातील पदाधिकारी यांनी दिले आहे.
अध्यक्ष महेश खैरनार, उपाध्यक्ष वासुदेव मांडगे, सचिव मनोज शिंपी, सहसचिव भरत शिंपी, खजिनदार दीपक खैरनार, सदस्य पांडुरंग कापुरे, तुळशीराम शिंपी, रमेश पवार, नरेंद्र इसई, सुरेश कापडणे, राजेश शिंपी, अभिजीत भांडारकर, महिला सदस्या रंजना शिंपी आदींनी निवेदन दिले आहे


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.