Halloween party ideas 2015

पांझरा नदीवरील फुटलेला बंधारा दुरुस्तीसाठी शासन पातळीवर योग्य तो पाठपुरावा करू
आमदार अनिल पाटील.
बाम्हणे येथे जि.प.शाळा संरक्षण भिंतीचे व विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन.

प्रतिनिधी-अमळनेर

सुरक्षित शाळा, सुरक्षित मुले या उपाययोजनांतर्गत अमळनेर तालुक्यातील बाह्मणे जि.प.प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन व विविध विकासकाम उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणुन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या सोबत कामगार नेते एल.टी.पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, रामराव पाटील, सरपंच प्रविण ओंकार पाटील, माजी सरपंच चंद्रकांत पोपट पाटील, गणेश धर्मराज भामरे, दिव्यमराठी पत्रकार अमळनेर चंद्रकांत पाटील, प्रकाश राजाराम पाटील, विजय लोटन पाटील, महेश पाटील, धर्मराज पाटील, भैय्यासाहेब पाटील, युवराज पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, भिकन बारिकराव पाटील, रविंद्र मिस्तरी, दत्तात्रय पाटील, दिनेश हिरालाल पाटील, रतिलाल पाटील, तुषार पाटील, अमृत देविदास पाटील, मोतीलाल बाजीराव पाटील, सुनिल सुपडू पाटील, शरद पाटील, देविदास नेरकर, सुनिल मन्साराम पाटील, स्वप्नील पाटील, संजय लोटन पाटिल, दिनेश पाटील, किशोर हिम्मतराव पाटील, किशोर रंगराव पाटील, बापूराव पाटील, रामचंद्र पाटील, सुभाष दयाराम पाटील, नवल हिम्मत पाटील, अनंत भाऊराव पाटील, वना नाथबुवा, दुर्योधन नेरकर, शशिकांत पाटील, नितीन पाटील, मनोहर पाटील, मुरलीधर पाटील, प्रदीप पाटील, कैलास पाटील, सागर पाटील, गिरीश पाटील, राज पाटील, कल्पेश पाटील, सोबत उपस्थित पांझरा परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का.स.सो.चेअरमन, संचालक, बाह्मणे जि.प.शाळा शिक्षिका श्रीमती दीपाली अमृत भामरे, श्रीमती ज्योत्स्ना पांडुरंग पाटील यांच्या सह बाम्हणे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक अभिजित देवरे, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
जिल्हापरिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याने शाळा सुरक्षित झाल्या असून मुलेही सुरक्षित राहणार आहेत, त्यामुळे शैक्षणिक साहित्य चोरी, शालेय पोषण आहार चोरी आदी बाबींवर नियंत्रण मिळवता येणार आहे, संरक्षक भिंत असल्याने मैदानातील मुलांवर देखील शिक्षकांचे लक्ष केंद्रित होणार आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त करून आमदार अनिल भाईदास पाटील यांचे सुरवातीला जोरदार आतिषबाजी करून फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.

पांझरा नदीवरील फुटलेल्या बंधारा दुरुस्ती कामाला प्राधान्य दिले जाईल- आमदार अनिल पाटील
यावेळी सत्काराला उत्तर देतांना आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात पाच वर्ष गावाला विकास कामे कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली, गावातील प्रलंबित प्रश्नांना व विकासाला चालना दिली जाईल तसेच पांझरा नदीवरील फुटलेला बंधारा दुरुस्तीसाठी शासन पातळीवर योग्य तो पाठपुरावा केला जाईल व लवकरचं आपल्या मागणी प्रमाणे विकासकामांचे लवकरचं भूमिपूजन केले जाईल असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी मनोगत द्वारे व्यक्त केले.

आपल्या मनोगतात जि.प.सदस्यां जयश्री अनिल पाटील म्हणाल्या की ग्रामस्थांनी केलेल्या स्वागतामुळे आपण भारावून गेलो आहे, बाह्मणे गावाला आलो की असे वाटते की मी माझ्या गावीच आली आहे असे प्रेम आपल्याला कायम बाह्मणे गावाच्या वतीने मिळाले आहे, असेच प्रेम व आशिर्वाद कायम पाठीशी असू द्या ही अपेक्षा व्यक्त केली.

कर्जमाफी व पीकविमा लाभ मिळवुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी केला आमदारांचा विशेष सत्कार- बाह्मणे गावसह अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवुन देऊन 10 मंडळातील शेतकऱ्यांना 63.86 कोटी रुपये पीकविमा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर करून दिल्याबद्दल आमदारांचा शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

जि.प.शिक्षिका व ग्रामसेवक यांचा आमदारांनी केला सत्कार- बाह्मणे जि.प.शाळेच्या उंचावलेल्या गुणवत्ता बाबत, नाविन्यपूर्ण उपक्रम व स्नेहसंमेलन चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल, तसेच शाळेच्या मुलांचा आरोग्य विषयी काळजी घेऊन शालेय पोषण आहार वाटपात योग्य नियोजन ठेवुन कोरोणा पार्श्वभूमीवर अग्रेसर राहुन कामकाज केल्याबद्दल बाह्मणे जि.प.शाळा शिक्षिका श्रीमती दीपाली अमृत भामरे, श्रीमती ज्योत्स्ना पांडुरंग पाटील यांचा व ग्रामसेवक अभिजित आण्णासाहेब देवरे यांचा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गणेश भामरे यांनी आपल्या मनोगतात आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कोरोणा पार्श्वभूमीवर केलेले कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून आमदारांनी वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या सामुग्री व तालुकास्तरावर निर्मिती झालेल्या पहिले कोव्हिडं हॉस्पिटल व कोव्हिडं केअर सेंटरच्या योगदान विषयी तसेच कर्जमाफी व पीकविमा मंजुर करून दिल्याबद्द्ल व उन्हाळ्यात पांझरा नदीत अक्कलपाडा आवर्तन सोडण्यासाठी केलेल्या पाठपुरावा बद्दल आमदार अनिल भाईदास पाटील यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश भामरे यांनी केले.




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.