पत्रकार ईश्वर महाजन यांचा आँल मिडीया प्रेस दिल्लीच्या वतीने सन्मान
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी हायस्कूलचे उपशिक्षक व पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांच्या शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल आँल मिडिया असोसिएशन दिल्ली यांनी सन्मानपत्र पाठवून सन्मान केला.
दैनिक साईमतचे अमळनेर तालुका प्रतिनिधी यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून अनेक समाजातील उपेक्षित लोकांचे प्रश्न वृत्तपत्रात मांडून न्याय दिला आहे. ते मराठी लाईव्ह न्युज या लोकप्रिय पोर्टलचे संपादक आहेत. पोर्टलच्या माध्यमातून अनेक बातम्यांना यथायोग्य प्रसिद्धी दिली आहे. देवगांव देवळी हायस्कूलमध्ये ते अठरा वर्षापासून उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल आतापर्यंत अनेक संस्थांनी घेतली आहे. आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाच्या बाबतीत राज्यातील परिस्थिती व नागरिक, कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने व उपाय, कोरोना काळात माझी शाळा,माझे उपक्रम अशा विविध विषयावरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल आँल मिडिया प्रेस दिल्ली या असोसिएशनचे श्रीमान मुकेश कुशवाहा जी राष्ट्रीय अध्यक्ष ऑल मीडिया प्रेस एसो. दिल्ली ,विजय पांचाल राष्ट्रीय महासचिव ऑल मीडिया प्रेस दिल्ली यांनी घेऊन सन्मानपत्र मेलद्वारे पाठवून सन्मानित केले.
ईश्वर महाजन यांचे अभिनंदन साईमतचे मुख्यसंपादक प्रमोद ब-हाटे व साईमत परीवार जळगाव,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्यसंपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर,देवगांव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, खान्देश माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा उपसरपंच मुरलीधर महाजन,पारोळा भूषणचे संपादक भिका चौधरी, क्रिकेट समिक्षक दत्ता विघावे,
शब्दगंगाचे संपादक देवेंद्र पाटील,भिलालीचे माजी सरपंच दिनेश माळी,सावता प्रेरणा प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष प्रविण महाजन, प्रभाग चौदाचे भावी नगरसेवक रवींद्र पाटील,देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, महाराष्ट्र पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे व पत्रकार ,शिक्षक,व सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.
