आँनलाईन अध्यापन वेबिनारचा समारोपात तंत्रस्नेही शिक्षक राहूल चौधरी यांनी केले आँनलाईन चाचणी निर्मितीसाठी मार्गदर्शन.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व तंत्रस्नेही शिक्षक गृप द्वारा आयोजित
ऑनलाईन अध्यापन वेबिनार मध्ये समारोपीय सत्रात श्री राहुल चौधरी यांनी Testmoz द्वारा ऑनलाईन चाचणी निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले . ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चाचणी करता येईल यासाठी प्रात्यक्षिक द्वारा मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली . अगदी सखोल पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना काळात
विद्यार्थ्यांना या ऑनलाईन चाचणी द्वारा आपला घटकाचे व्यवस्थित रित्या आकलन झाले आहे हे पाहता येईल.
कोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी राहुल चौधरी सर व त्यांचे सहकारी प्रभात तडवी मनोहर तेजवाणी , सुनील बडगुजर , संभाजी हावडे, संदीप सोनार महेंद्र नेमाडे , भूषण महाले यांनी विशेष प्रयत्न करून जि प शिक्षण विभाग जळगाव च्या सहकार्याने या तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन केले या कार्यशाळेस श्री विजय पवार साहेब शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पेड सुविधा उपलब्ध केली, तसेच श्री किशोर वायकोळे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
2 जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली असून आतापर्यंत विविध विषयांवर या वेबिनारचे 15 सेशन संपन्न झालेले आहे त्यात ऑनलाईन अध्यापनासाठी उपयुक्त माध्यमांची माहिती शिक्षकांना देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला आहे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री बी. एन पाटील यांच्या प्रेरणेने तसेच श्री बी.जे पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व श्री बी.एस अकलाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या संपूर्ण कर्यक्रमासाठी श्री विजय पवार व श्री किशोर वायकोळे शिक्षणविस्तार अधिकारी तसेच शिक्षक श्री राहुल चौधरी व प्रभात तडवी यांनी या ऑनलाईन वेबिनार साठी विशेष प्रयत्न केले.
या कार्यशाळेत श्री संदीप सोनार सर यांनी झूम मीटिंग व गुगल फॉर्म , श्री सुनीलकुमार बडगुजर यांनी विविध शैक्षणिक अँप व स्मार्ट pdf , श्री भूषण महाले यांनी jio मिट ,श्री संभाजी हावडे यांनी youtube व गुगल टूल्स ,
श्री मनोहर तेजवाणी यांनी पॉवर पॉइंट द्वारा व्हिडिओ निर्मिती , श्री आनंद अानेमवाड यांनी अनिमेटेड व्हिडिओ निर्मिती, श्री बालाजी जाधव सर यांनी कोरोना काळात 100% विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचता येईल याविषयी मार्गदर्शन केले श्री भूषण कुलकर्णी सर यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर व त्यासाठी वापरली जाणारी प्रणाली ,श्री महेन्द्र नेमाडे यांनी जिओजेब्रा चा गणित अध्यापनात प्रभावी वापर श्रीमती सुनीता लहाने यांनी गणित झाले सोपे झीरो बजेट नावीन्यपूर्ण उपक्रम
श्री यजुर्वेद महाजन सर यांनी १० वी , १२ वी व पदवी नंतर पुढे काय ? , श्रीमती प्रतिभा भराडे यांनी मुल नातेसंबंध व ज्ञानरचनावाद ,
तर शेवटचं समारोपीय सत्रात राहुल चौधरी यांनी testmoz विषयी मार्गदर्शन केले.
श्री प्रभात तडवी , मनोहर तेजवाणी राहुल चौधरी यांचे कार्यशाळेस तांत्रिक सहकार्य लाभले संपूर्ण कार्यशाळेस जळगाव तंत्रस्नेही टिम चे सहकार्य लाभले.सर्व सहभागी शिक्षकांना ई प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले
