Halloween party ideas 2015

*शिक्षण संघर्ष संघटनेचे राज्यभर दि.२७ जुलैला थाळीनाद आंदोलन*
*२००५ पूर्वी नियुक्त* शिक्षक बंधूनो ,
आपण आजपर्यंत आपला पेन्शन हक्क मिळवण्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अनेक बंधू तात्पुरतेने लढय़ात सहभागी झाले.तालुक्यातील आंदोलन , जिल्यातील आंदोलन , प्रत्येक आमदारांना निवेदन , मुंबई येथे आंदोलन , नागपूर येथे आंदोलन , आणि कोर्टाची लढाई या सर्व लढ्याला मार्गदर्शन मा. *.सांगिताताई शिंदे व राज्य कोर कमिटी* यांचे मार्गदर्शनाने लढा दिला त्यात आपल्याला ८०% यश मिळाले.आपला प्रश्न सोडवण्यासाठी समितीचा नेमली गेली.समितीचा निर्णय आपल्या बाजूने येणारच हे स्पष्टपणे दिसत होते पण आपल्या जमेच्या ज्या बाजू होत्या त्या नष्ट करण्याचे कामाला सुरुवात शिक्षण सचिवांनी केली.१० जुलैना अधिसूचना काढली ती मागे घेण्यासाठी *शिक्षण संघर्ष संघटना* सह राज्यभरातील शिक्षण संघटना पुढे आल्या.आपले प्रतिनिधी सर्व विभागले शिक्षक आमदार यांनी हरकती घेतल्या.अनेक शिक्षक बंधूंनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शिक्षणमंत्री , शिक्षण सचिव यांना ईमेल , ट्वीट , रजिस्टर केले त्यांचे *खूप अभिनंदन* पण अजूनही अनेक शिक्षक बंधूंमध्ये १५ /२०वर्षाची उदासीनता तशीच आहेत.काही संघटना , पक्षाच्या नावाने राजकीय खेळी खेळतात.पण मित्रांनो येथे **आपण फक्त पेन्शन पिडीत आहोत.**बाकी सर्व विसरा तेच आपल्या कामाचे आहे. शेतकऱ्यांच्या दूध आंदोलन बघा कसे आक्रमक झाले.तसे आक्रमक आंदोलन आपल्याला करायचे आहे *.दि.२७ जुलै , सोमवारी आपल्या तालुक्यातील आमदार निवास समोर थाळीनाद करायचा आहे* आमदार कोणत्याही पक्षाचे असो त्यांना निवेदनाद्वारे आपली मागणी समजून देवून संबंधित मंत्र्यांना फोन करायला लावणे.त्यांच्या लेटरवर आपली मागणी करणे.ती पूर्ण होईपर्यत तेथून न निघणे ही भूमिका घ्यावी.कारण येणाऱ्या *३ , ऑगस्टला विधानसभेत* आपली बाजू मांडलीच पाहीजे.स्पष्टपणे बोलतो मित्रांनो *आपल्याशी दगा होत आहे* *मा.अजितदादा पवार , शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचा आपल्याला स्पष्टपणे नकार आहे.*आणि आपले आमदार त्यांची आणि आपली दिशाभूल करत आहेत आपली संख्या दोन लाखांपेक्षा जास्त सांगत आहेत.पण प्रत्यक्षपणे ती *सत्तावीस हजार* इतकीच आहे .आपल्या अधिकाऱ्यांनी *पंधरा वर्ष* आपल्याला टांगून ठेवले आहे. आता ही अंतिम संधी आहे.प्रत्येक पिडीत बंधूनी गट , तट , संघटना , पक्ष न करता बाहेर पडावे.लोकांना कोरोना आता होत आहे.आपल्याला पंधरा वर्षापासून जखडून ठेवले आहे.हे विसरू नका.आपल्याला पोलिस स्टेशन परवाना , निवेदन प्रत PDF उदया पाठवण्यात येईल सर्वांना हात जोडून विनंती एक दिवस सर्व काम बाजूला ठेवा , आळस झटका मोठ्या ताकतीने आंदोलनात सहभागी व्हावे.मिडियाला आंदोलन कव्हरेज करायला सांगा.पेपरमध्ये बातमी दया.जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन झालेच पाहीजे.फोटो काढा.आंदोलनाचे अजून मार्गदर्शन *उदया झूम मिटींग मध्ये दिले जाईल जास्तीत जास्त बंधूंनी मिटींगमध्ये सहभागी व्हावे.* अडचण , समस्या असेल तर फोन करा.विसरू नका मित्रांनो आता नाही तर कधीच नाही.
धन्यवाद !
*एकच मिशन जुनी पेन्शन*
आपल्यापैकी एक
श्री.संभाजी पाटील सर
8329961936
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.