Halloween party ideas 2015

आयपीएल परदेशात होणे नवे नाही

संपूर्ण जगभर कोविड -१९ या महाभयंकर आजाराने हाहाकार माजविल्याने जगभरातील सर्वच घटकांचे जनजीवन व इतर तत्सम कार्य गेले सहा महिन्यांपासू ठप्प झाले असून त्याचा फटका समस्त क्रिडा जगताला बसलेला आहे. त्यामध्ये क्रिकेटचाही समावेश असल्याने जगभरातील क्रिकेटशी संबधीत मग ते खेळाडू असो वा संघटक अथवा चाहते सर्वच जण बेचैन झाले होते. जुलै महिन्याच्या आठ तारखेला ११७ दिवसांच्या गॅप नंतर इंग्लंड व विंडीज यांच्यातील कसोटी सामन्याने क्रिकेट पुनर्जिवीत झाले. परंतु येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होऊ घातलेली टि-२० विश्वचषक स्पर्धा तेथील सरकार व क्रिकेट मंडळाच्या असमर्थतेनंतर आयसीसीने स्थगित केली आहे. त्यामुळे जगातील सगळ्यात मोठी टि- २० लिग स्पर्धा आयपीएलच्या आयोजनला वाट मोकळी झाली आहे.
वास्तविक २९ मार्च २०२० पासून आयपीएलचे तेरावे सत्र भारतात सुरू होणार होते, परंतु कोरोना व्हायरसने आपले पंख जगभर पसरविल्याने बीसीसीआय समोर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र आयसीसीने टि- २० विश्वचषक स्पर्धा स्थगित केल्याने आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे. मात्र भारतात सध्या कोरोना व्हायरसने आक्राळविक्राळ रूप धारण केल्याने आयपीएलच्या या सत्राचे आयोजन भारतात असंभव आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा भारताऐवजी युएई म्हणजे युनायटेड अरब अमिरात येथे होणार आहे.
आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्याची हि पहिली वेळ नसून यापूर्वीही आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्यात आले आहे. सदरच्या लेखात आपण याच विषयावर एक दृष्टीक्षेप टाकणार आहोत.
सन २००८ मध्ये आयपीएलचे पहिले संस्करण भारतात झाले. त्यानंतर सन २००९ मध्ये एप्रिल - मे दरम्यान भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या व तो कालावधी आयपीएल स्पर्धेसाठी नियोजित केल्याने आयपीएलचे दुसरे सत्र भारतात न होता दक्षिण आफ्रिकने आयपीएल स्पर्धेचे आयोजक पद भूषविले.
भारतात लोकसभेच्या निवडणुकांमुळे सुरक्षा यंत्रणेवर पडणारा त्रास बीसीसीआय व द. आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने यशस्वीरित्या त्या स्पर्धेचे संयोजन केले. त्या सत्राच्या अंतिम फेरीत डेक्कन चार्जर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूला ( आरसीबीला ) हरवून विजेतेपद मिळविले.
सन २०१४ मध्ये ही आयपीएलचे भारताबाहेर आयोजन करण्यात आले. त्या वर्षीही भारतात लोकसभे च्या निवडणुका आयपीएलच्या नियोजित कार्यक्रमा दरम्यान होत्या. त्यावेळी मात्र सुरूवातीच्या काळातील काही सामने युएईमध्ये खेळविण्यात आले. त्या स्पर्धेचा अंतिम सामना भारतात खेळविण्यात आला. कोलकाता नाईट रायर्डस् ( केकेआर ) ने विजेतेपद मिळवून आपली विजेतेपदाची संख्या दोनवर नेली.
सन २००९ च्या स्पर्धेत आरसीबीने व चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडचे केविन पिटरसन व अँड्रयू फ्लिंटॉफ यांना सर्वात जास्त म्हणजे ७.३५ कोटी रुपयांना विकत घेतले. तर सन २०१४ च्या स्पर्धेत आरसीबीने युवराजसिंग याला १४ कोटीला विकत घेतले होते.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सीलने कार्यक्रमाची रूपरेषा ठरविली असून स्पर्धेत ६० सामने खेळविले जाऊ शकतात व स्पर्धेचा संभावित कालावधी २६ सप्टेंबर ते आठ नोव्हेंबर २०२० असू शकतो.
यंदा आयपीएल भारताबाहेर होत असली तरी आता ती भारताबाहेर होणं कोणासाठी अप्रुप राहीलेली नाही.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.