*वावडे हायस्कूल च्या चिमुकल्यांचे तंबाखूमुक्त शाळेच्या आरास द्वारे गणरायास साकळे*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील वावडे स्थित, श्री. बी. बी. ठाकरे हायस्कूल मध्ये ह्यावर्षी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी मिळून शाळा व शालेय परिसर तंबाखूमुक्त होण्यासाठी चक्क गणपती बाप्पालाच साकळे घातले आहे. झाले असे की ,योगायोगाने शालेय शिक्षण विभाग व सलाम मुंबई फौंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी एक महा अभियान राबविले जात आहे. त्याच संधीचा फायदा घेऊन मुख्याध्यापक डी. ई. पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून अभियानाचे तालुका समन्वयक एन. आर. पेंढारे यांनी विद्यार्थ्यांकडून चार्ट तयार करून घेतले ह्याकामी इ.9वी व 10 वी च्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट काम केले. ह्यात तंबाखु खाण्याचे दुष्परिणाम, त्यातील रासायनिक घटकांचे शरीरावर होणारे परिणाम, तंबाखू घातक का आहे, तंबाखू सोडण्याच्या युक्त्या,, विविध घोषणा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासाठी जे. बी. राजपूत, आर. आर. पारधी, भाग्यश्री सावळे, अनिल पाटील, सुनील पाटील ,प्रल्हाद पाटील,व्ही. एम. पाटील यांनी मेहनत घेतली तर बी. एच. सूर्यवंशी,रवींद्र देवरे, हरिष ठाकरे, बी. बी. पाटील, एम. पी. मोरे, अनिल धोबी ,भगवान सूर्यवंशी, राजू पिंपळे, अविनाश निकम यांचे सहकार्य लाभले.
वावडे हायस्कूलच्या बालगोपालांनी गणपतीच्या आरासद्वारा तंबाखुमुक्तचा दिला संदेश
छाया ईश्वर महाजन अमळनेर