Halloween party ideas 2015


अमळनेरच्या युवा उद्योजकांनी बनवलेल्या हाताच्या स्पर्श विरहित सॅनिटायझर स्टँड यंत्र हाताळताना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

संपूर्ण जगात ! एका अदृश्य कोरोना विषाणूमुळे होतोय मानव जातीचा घात ! त्यातूनच आपल्या अमळनेरातील युवा मेकॅनिकल इंजिनिअर धीरज चव्हाण आणि गौरव पाटील या जिवलग मित्रांच्या विचार आला मनात आणि ' थांबवू या किरोनाचा कहर , हातासाठी करूया सानिटायझरचा वापर ' या कल्पनेतून व श्री डी ए सोनावणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर वापर स्टँड यंत्र तयार केले आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेन्द्रजी मोदी यांच्या ' आत्मनिर्भर बना ' या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण स्वदेशीतुन खान्देशी मजबूत आणि दणकट बनावटीच्या स्टँडची हाताळणी करतांना मा. तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी 'देऊया खान्देशी दणका , करूया कोरोनाचा भनका ' असे म्हणत गौरवोद्गार काढून उपकरणाविषयी आनंद व्यक्त केला . आणि सदरचे उपकरण हे आबाल वृद्धांपासून सर्वांनाच विविध आजारांनवर मात करण्यासाठी या सॅनिटायझर उपकरणाचा फारच उपयोग होईल आणि आपले आणि सामाजिक आरोग्य चांगले सशक्त ठेवता येईल .असेही मत व्यक्त केले . यावेळी कृषी विभागाचे अधिकारी भरत वारे साहेब ,लिपिक सोनवणे, प्रवीण गोसावी, सेवक शिवाजी कोळी , आणि उपक्रमशील शिक्षक डी . ए. सोनवणे सर यांच्यासह धिरज चव्हाण व गौरव पाटील उपस्थित होते . अधिक माहिती साठी 9284828126 , 9206002727 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले..

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.