प्रति,
मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
शिवसेना पक्षप्रमुख
विषय - भास्करराव अंबेकर शिवसेना जिल्हाप्रमुख जालना यांना विधान परिषदेवर घेणे बाबत..
महोदय,
वरिल विषयी निवेदन सादर करतो की मा.श्री.भास्करराव अंबेकर साहेब हे विद्यार्थी दसेपासुन सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक, नगराध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी शिवसेनेत निष्ठापुर्वक पार पडल्या असून त्यांना अनेक वेळा विधानसभा निवडणुकीत डावलून सुद्धा त्यांनी शिवसेनेवर कायम निष्ठा ठेवत आजही पक्ष कार्यासाठी तळमळीने स्वतःला वाहून घेतले आहे.
महाराष्ट्रात माळी समाज लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर २ वर असून मराठवाड्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकाही माळी समाजातील एकाही कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही. तरी पण माळी समाज कायम ७० ते ८० टक्के शिवसेनेसोबत असून दि.१५ /६ /२०२० ला विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त होत असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांना सर्व माळी समाज व मा.श्री.भास्करराव अंबेकर साहेब समर्थक याची एकच नम्रपणे विनंती आहे की, शिवसेना जिल्हाप्रमुख जालना मा.श्री.भास्करराव अंबेकर यांना विधान परिषद उमेदवारी देण्यात यावी. अशी जालना जिल्ह्यातील शिवसैनिक, महाराष्ट्र माळी समाज व अंबेकर साहेब समर्थक याची आपणास कळकळीची नम्र विनंती....
👏👏👏
आपलास्नेही
*चेअरमन*
*रावसाहेब अंभोरे* माळी समाज प्रबोधनी मराठवाडा विभाग 9423729740
