Halloween party ideas 2015


स्वातंत्र्य सैनिक शहादू जिभाऊ चौधरी यांची ३७ वी पुण्यतिथी सोशल डिस्टींगचे नियम पाळून साजरी

आडगाव तां एरंडोल :

येथील स्वातंत्र्य लढयातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सामाजिक व राजकिय क्षेत्रातील जाणकार नेतृत्व शहादू जिभाऊ चौधरी यांची ३७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सकाळचे पत्रकार प्रल्हाद यांनी मनोगतात सांगितले की आडगावची ओळख संबध महाराष्ट्रात आहे संत माहूजी महाराज यांचे आडगाव शहादू जिभाऊंचे आडगाव नंतरच्या काळात सहकारमहर्षी व जिल्हाचे नेते खंडेराव आबांचे व माजी आमदार पारूताई वाघ यांचे आडगाव नावारूपाला आले या नगरीत यशवंतराव चव्हाण पासून तर शरद पवार व सर्वच नेते मंडळीनी हजेरी लावली आहे हि नगरी संताची भूमी सहकार शिक्षण राजकिय सामाजिक व स्वातंत्र्य काळातील हुतात्मांची भूमी ओळखली जाते कार्यक्रमास मोचक्याच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थित होती सोशल डिस्टींग नियमाचे पालन व मास्क लाऊन ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते यावेळी माजी सरपंच मोहनदास महाजन शेतकी संघाचे माजी अध्यक्ष उत्तमराव पाटील मा उपसरपंच रविंद्र पवार मा सरपंच दिलीप पाटील राष्ट्रीय मानवाधिकार न्याय सामाजिक संगठन व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा लोकमतचे पत्रकार प्रमोद पाटील चिलाणेकर तालुका भष्ट्राचार निर्मुलन समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण ठाकूर सोपान चौधरी कैलास तागड युवा कार्यकर्ते जितेंद्र तागड अमोल पाटील महेश चौधरी अनंत चौधरी जगदीश चौधरी सुभाष चौधरी मनोहर चौधरी भूषण महाजन बापू महाजन आदि उपस्थित होते आभार आयोजक लक्ष्मण ठाकुर यांनी मानले शेवटी प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी सागितले की घरीच थांबा सुरक्षित रहा काम असेल तरच सुरक्षित व नियमांचे पालन करून जा असा संदेश दिला

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.