Halloween party ideas 2015


विद्युत खाबांवर दुरुस्ती करतांना शॉक लागुन कर्मचाऱ्याचा मृत्यु

विजमंडळाचा असमन्वयामुळे राकेशच्या मृत्यु?

कळमसरे सबस्टेशन अंतर्गत कळमसरे -मारवड रस्त्यावर बोहरे फिडरचे मुख्य विज वाहिणीच्या खाबांवर
चढून काम करीत असतांना शॉक लागून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कळमसरे येथे कार्यरत असलेला युवा तंत्र कर्मचारी राकेश अरुण साळुंखे वय (२९) राहणार मारवड याचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक 23 मे रोजी कळमसरे शिवारात सकाळी ११:३० वाजता घडली. विजेचा प्रवाह सुरू होऊन शाँक लागून वीज खांबा वरून पडल्याचे प्रत्यक्ष दर्शी गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे विज वितरण कंपनीच्या समन्वयाच्या अभाव
समोर आला असुन,या प्रकरणाने विज वितरण कंपनीच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत सर्विस्तर वृत्त असे की कळमसरे- मारवड रस्त्यावरिल मुख्य विद्युत प्रवाह बंद झाल्याने या रस्त्यावर कळमसरे गावापासून ४०० मीटरवर असलेल्या शेतातील मुख्य विद्युत खाबांवर बोहरे फिडरचे जम्प तुटून बिघाड झाल्यामुळे राकेश साळुंखे हा परमिट घेऊन विद्युत खाबांवर दुरुस्ती साठी चढला होता दुरुस्ती करीत असतांना अचानक विद्युत प्रवाह चालु झाल्याने शॉक लागला व तो जमिनीवर पडला तोच त्याच्यासोबत काम करीत असलेले सहकारी यांनी त्यास अमळनेर येथील डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात नेले असता डॉ अनिल शिंदे यांनी राकेश यास मृत घोषित केले. यानंतर त्याचे शव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपविला,यावेळी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता मनोज पवार ,कळमसरे सबस्टेशचे अभियंता अंकित गावंडे व कर्मचारी सह नातेवाईक उपस्थित होते त्याचेवर सायंकाळी शोकातुल वातावरण मारवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले , याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अभियंता अंकित मोहन गावंडे यांनी पहिले दिलेल्या खबर मधे जम्प तुटुन राकेश जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यु झाल्याचे मारवड पोलिसांना ख़बरित सांगितले.परंतु राकेश साळुंखे याचे दोन्ही हात शॉक लागल्याने काळे पडले म्हणुन गावातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने नागरिकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि अभियंता अंकित गांवडे यांनी महावितरण कंपनीच्या बचवासाठी खोटी माहिती सांगितली आहे पोलिसाना सांगितले. अभि. अंकित गांवडे यांनी मारवड पोलिसात संद्याकाळी पुन्हा येऊन अधिक माहिती देत सांगितले की राकेशचा मृत्यु हा शॉक लागूनच झाला आहे.त्यांनी खबर दिल्याने पोलिसातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे हे करीत आहेत. विज पुरवठा अचानक सुरु झाल्याने राकेश साळुंखे याच्या मृत्यु झाल्याचे
सांगितले.यावेळी घटनास्थळी अभियंता अंकित गावंडे व कर्मचारी ही उपस्थित होते.


मृत्युचे कारण गुलदसत्यातच? विजमंडळाचा असमन्वय

अभियंता अंकित गावंडे यांनी सकाळी 9:30 वाजेपासुन परमिट घेतले होते. तरीही राकेश साळुंखे यास शॉक लागलाच कसा? याचे उत्तर अजुन गुलदासत्यातच आहे.
हा प्रकार घडला त्या वेळेस विज पुरवठा खंडित करण्यात आला होता.मात्र काम सुरु असतांना अचानक विज पुरवठा कसा काय सुरु झाला,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विज वितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनमधे असलेल्या असमन्वयाचा हा परिणाम असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

सुरक्षा ऐरणीवर

राकेश साळुंखे याच्या शॉक लागुन मृत्यु झाल्याने कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे का? कर्मचाऱ्यांना हॅंडग्लोज देण्यात आले होते का? आणि दिले होते तरी असे कसे काय घडले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीने विजेच्या खांबावर चढावे लागते.त्यामुळे पुढे पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासाठी विज वितरण कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.अचानक विद्युत पुरवठा सुरु होने किंवा यांसारख्या घटनांमुळे कर्मचाऱ्यामधेही भितिचे वातावरन निर्माण झाले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.