Halloween party ideas 2015


"स्वत:ला सोन्याप्रमाणे घडवा".
बॅड पॅच— एक संघर्ष !
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी बॅड पॅच येतो ।
शांत सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यात , करियरमध्ये , नात्यामध्ये केव्हा तरी काही तरी बिघडतं.व्यवहारात काही तरी लोच्या होतो.पैशांची बिकट वाट लागते...नड येते आणि बहुधा हे सारं एकदमच..एकाच वेळी घडून येते.
हा असा 'बॅड—पॅच' आला की तो आपल्या आयुष्यात महिना,दोन महिने,किंवा क्वचित दोन चार वर्षेही रेंगाळतो....आपलं आयुष्य आंतर बाहय हलवून टाकतो... आयुष्य नकोसं करून सोडतो.आपण कितीही नाही म्हटलं ,टाळायचं ठरवलं तरीही हा असा 'बॅड पॅच' येतोच. संपूर्ण आयुष्यात एकदा-दोनदा-चार पाच वेळा कितीही वेळा येतो.अन आपल्याला तो भोगावा लागतो..कितीही नकोसा वाटला,कितीही त्रास झाला तरीही !
पण या बॅड पॅच चे काही विलक्षण फायदेही असतात यातील दोन प्रमुख फायदे म्हणजे....
१) खरोखर आपलं कोण आहे आणि कोण आपलं नाही'हे या बॅड पॅच काळातच कळतं.आपल्या या अशा पडत्या काळात कोण आपल्या सोबत व पाठीमागे खंबीरपणे ऊभे राहतात,या कठीण काळातही कोण आपली साथ सोडत नाही,कोण आपल्याला धीर देतो,आधार देतो" हे फक्त 'बॅड पॅच' असतांनाच कळतं.,समजतं.
२) या बॅड पॅच काळात आपली स्वत:ची नव्याने ओळख होत राहते.अत्यंत वाईट परिस्थितीत आणि कठीण प्रसंगात आपण कसे वागतो? कसे बोलतो?काय काय व कसा,कोणकोणता निर्णय घेतो? हे आपल्याला समजु शकतं.आपली शक्तिस्थळं आणि मर्यादा यांची आपल्याला नव्याने जाणीव होते.व्यापारी,कलाकार,राजकारणी,बुद्धिजिवी,सामान्य माणसं ,नोकरदार,समाजकारणी इ.कोणालाच या बॅड पॅच पासून वाचता येत नाही पण हा वाईट काळ प्रत्येकालाच काहीतरी शिकवून जातो.यामुळे माणसाचा स्वत:विषयीचा आत्मविश्वास बळावतो आणि जगण्याविषयीची नम्रता देखील अंगी येते.
अर्थात असं बॅड पॅच येणे हे आपल्या हातात नसतं,त्याला टाळणं देखील आपल्या हाती नसतं.पण जेव्हा तो आपल्या जीवनात येतो तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा,Re act कसं करायचं हे मात्र आपण करू शकतो.आपला बॅडपॅच आहे म्हणून ऊद्दामपणे जगत रहायचं आणि त्यातून स्वत:चे नुकसान करवून घ्यायचं की तो स्विकारून नम्र व्हायचं,आत्मपरीक्षण करायचं,स्वत:त बदल घडवून सजगपणे जगायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं !
संघर्षातून जीवन जगण्याची मजा कुछ औरच असते.प्रयत्न आणि अनुभव हाच खरा शिक्षक असतो.यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचं असतो.आपलं आयुष्य,मित्र मंडळी,कंपनी,वरिष्ठ,काम,नोकरी इ.बदल झाल्यामुळे कधीही बदलत नसतात ,ते बदलतात फक्त आणि फक्तआपण 'स्वत:च बदलतो' तेव्हाच । आपल्याला जर कोणी प्रगतीपासून रोखु शकत असेल तर तेव्हाही फक्त आणि फक्त आपणच स्वत: । कंटाळा,आळस,नाकर्तेपणा,उदासीनता,प्रत्येक गोष्टीतून पळवाट काढणे या गोष्टी फक्त 'आपणच स्वत: करीत असतो.!
मी गरीब आहे,माझ्याजवळ पैसा नाही,हे नाही,ते नाही म्हणत लोकांसमोर रडगर्रहाण घेऊन गेलात तर लोक मदत तर करतच नाहीत पण आपल्या मजबुरीचा फायदा मात्र जरूर घेतात.त्यामुळे लोकांजवळ आपण अशा सबबी सांगून स्वत:चीच फसवणूक करवून घेऊ नये. स्वत:ला मजबूत करा—मजबूर नाही !
ज्यांची वेळ काळ,दीनमान खराब आहे अशांबरोबर माणसाने जरूर रहावे पण ज्याची "नियतच खराब "आहे अशांची सोबत सोडणेच बरे असते.
चांगल्या कामात निर्लज्ज व्हावे लागले तरी हरकत नाही पण मान-सन्मान,मोठेपणा,इगो,अहंकार इ.सर्व सोडा.फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा.शेंडी तुटो की पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच ! संकटे ,अडचणी आल्यात,विरोध झाला,अपमान झाला,कोणी नावे ठेवलीत,पाय ओढले,अडवणूक केली तरी आपला यशाचा ,प्रयत्नांचा मार्ग सोडू नये.
स्वत:ला सोन्याप्रमाणे घडवा.सोने तयार होतांना आजुबाजूच्या खुप खराब मातीतून तावलून सुवलून स्वच्छ बनत असते.असे तयार सोने पुन्हा मातीत मिसळले किंवा आगीत ओतले तरी ते फक्त उरते ते फक्त आणि फक्त सोनेच !
तेव्हा स्वत:ला सोन्याप्रमाणे घडवा !!!
......... जी.टी.टाक...
कळमसरे ता.अमळनेर 9545744490
(रविवार स्पेशल)

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.