Halloween party ideas 2015


शिक्षकांच्या मे महिन्याच्या वेतनाची तरतूद करा

भाजपा शिक्षक आघाडीची शिक्षण संचालकांकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनासाठी मुंबई विभागासाठी तरतूद कमी पडत असून तातडीने जादा तरतूद करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे
याबाबत आज अनिल बोरनारे यांनी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालकांकडे निवेदन दिले आहे. एप्रिल महिन्याचे वेतन देण्याचा वित्त विभागाने निर्णय घेतला होता त्यावेळी सुद्धा राज्यातील अनेक वेतन अधिक्षकांकडे निधी कमी पडत होता ही बाब लक्षात येताच अनिल बोरनारे यांनी शिक्षण संचालक, आयुक्त व वित्त विभागाकडे पाठपुरावा केला होता अखेर निधी मंजूर होऊन शिक्षकांना एप्रिल चे वेतन मिळाले.
कोविड १९ च्या कामासाठी राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या असून अनेक प्रकारची कामे शिक्षक करीत आहे त्यांना वेळेवर वेतन मिळाले पाहिजे यासाठी शिक्षण संचालकांनी तातडीने तरतूद करावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडी मुंबई विभागाचे सह-संयोजक सचिन पांडे, विजय धनावडे, सुभाष अंभोरे व बयाजी घेरडे यांनी दिली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.