*प्रवीण माळी सर यांच्या नाट्य संघर्षावर प्रकाश टाकणारा, अनेक दशकाच्या परंपरा मोडीत काढणाऱ्या एका नाटककाराची कथा.*
"मी अगदी पाच ते सहा वर्षाचा असेल. तेव्हा पासून चे मला आठवतं. आमचे बाबा जेव्हा गॅलरीत आपल्या साहित्यिक मित्रांसमवेत तासंतास गप्पा करत असायचे तेव्हा म्हणायचे अरे काल च्या कार्यक्रमात रसिकांनी काय जबरदस्त दाद दिली. अख्खे सभागृहात दणाणून सोडले. त्या तात्यांनी तर चिंटूच्या कवितेवर चांगलीच फिरकी घेतली हं. मी तर भारवूनच गेलो. अचानक आप्पांनी हजेरी लावली आणि सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले आणि हो त्यांचा तर साहित्याचा व्यासंग कमालीचाच आणि अख्ख्या सभेत ह्यांच्या बंड्याने तर हशाच पिकविला.असो बघता बघता कपातला चहा आणि कागदावरचा चिवडा कधी संपला लक्षात ही आले नाही हो. शेवटी न रहावता त्या कागदावरचे मसालेदार मीठ हळूहळू चाटून गेले.
शेवटी जाता जाता. अरे!! पुढच्या आठवड्यात एका अप्रतिम नाटकाचे आयोजित केले आहे, बरं का. चला आता तेव्हाच भेटू. सगळे घरोघरी गेले नी धोधो पावसाला सुरुवात झाली."(काल्पनिक)
अश्या स्वरूपाच्या अनेक गुळगुळीत गप्पा आपण टी. व्ही वरच्या वाहिन्यांवर ऐकतो, अश्या चर्चा सहजासहजी आपल्याकडे रंगत नाहीत. कारण प्रचलित संघर्षाच्या बेड्या तोडता तोडता एखाद्या अलिखित संघर्षाच्या जोखडात पद्धतशीर कसे गोवले जातो हे कुणाला गवसतच नाही.
ग्रामीण जीवनशैली ला शिक्षणाचा एकच आधार राहिला. नोकरी अथवा अन्य काही उद्योग व्यवसाय त्यातही करियर कौंसेलिंग चा अभाव.
अश्यातच नाट्यकला, अभिनय, संगीत, वाद्य वादन,गायन इ.कला व त्यातही परंपरा असावी लागते हा प्रचलित विचार प्रवाह. विशेष म्हणजे विशिष्ठ शिष्यांनाच शिष्यत्व मिळते. कारण एकलव्य आणि अर्जुन हा भेद आजही आहे. त्यातून प्रस्थापित व्यवस्थेला नुसता शह देण्याचा जरी विचार केला. तरी आपली शस्त्रे गळून पडावी. एवढी कमालीची अस्थिरता या समाजात दिसते.
त्यात सामान्यांचे जवळजवळ करिअर अजमावणे अशक्यच. करणे तर फार दुर.
कोणत्याही तयार असलेल्या वा घराणेशाहिच्या व्यासपीठावर कोणीही काहीही गिरवितो. मात्र खान्देशातील ग्रामीण भागातील सर्व सामान्य प्रेक्षकान्च्या प्रतिसादाने कलेच्या उच्च शिखरावर पोहचून जेव्हा ही व्यक्ती प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह पुणे येथे अहिराणी कस्तुरी कला व क्रिडा मंचच्या रंगमंचावरून आपली कला सादर करते. औरंगाबाद चे संत तुकाराम नाट्यगृह, नवी मुम्बई चे विष्णूदास भावे नाट्यगृह, धुळ्याचे हिरे भवन, अमळनेरचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,नाशिक चे कालिदास कलामंदिर दणाणून सोडते, तेव्हा इतर भाषांनी अहिराणीला पोटात घ्यावे इतक्या देखण्या व सुमधुर विविध नाट्य छटांमधून आपल्या विविध 45 पात्रांसहित एकपात्री प्रयोगातून अख्खे सभागृह हास्यकल्लोळ करून सोडतो तेव्हा कडकडाट टाळ्यांच्या स्वागतात त्यांना स्वीकारल्याशिवाय पर्याय रहावत नाही.
विशेष म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा न्यू दिल्ली येथील सुवर्ण संधी सोडून ह्या अवलियानं जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारून ग्रामीण भागातील मुलांवर गुणवत्तापूर्ण संस्कार करून नाट्य गुण कसे रुजविता येतील याचा विचार केला.महाराष्ट्रराज्य अभ्यासक्रम मन्डळ पुणे व बालभारती येथे पुस्तक लेखनात सदस्य (खेळू करु शिकू) व हाडाचा शिक्षक म्हणून ही ह्या व्यक्तिमत्वाची ख्याती अनमोल ठेवा आहे.
*आज मितीला हा कलावंत आपल्या नाट्य प्रयोगातून प्रस्तापित व्यवस्थेशी संघर्ष करत नाट्य कला क्षेत्रात माय अहिराणीचा मुकुटमणी घालून एका प्रतिक्रांतीला जन्म देतो व नायक म्हणून समोर येतो तेव्हा या समाजाची मान अभिमानाने उंचावते*
*आ. श्री प्रवीण माळी सर आपल्या "आयतं पोयत संख्यांन" या सुप्रसिद्ध नाटकाचा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश झाल्याबद्दल आपले शब्द सुमनांनी अभिनंदन करतो.*
💐💐💐💐💐💐💐
*_प्रा संदिप महाजन, अमळनेर._*_(लासुर)_
