Halloween party ideas 2015


*भाजपा शिक्षक आघाडीचे उद्या २२ मे रोजी राज्यात "शिक्षण बचाव आंदोलन*"

*सरकारच्या अपयशाचा निषेध शिक्षणाधिकाऱ्यांकडे करणार*

मुंबई (प्रतिनिधी) कोरोनाच्या नावाखाली शिक्षणक्षेत्रात गोंधळ वाढत चालला असून शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ भाजपा शिक्षक आघाडी उद्या २२ मे रोजी राज्यात शिक्षण बचाव आंदोलन करणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
लॉकडाऊन चे सर्व नियम काटेकोरपणे पाळून राज्यभरातील शिक्षण उपसंचालक तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जाणार आहे
भूगोल विषयाच्या गुणांचा तिढा अजूनही कायम असल्याने राज्यातील जवळपास १६ लाख पालक संभ्रमात आहेत. यावर शिक्षण विभागाने व एसएससी बोर्डाने ठोस निर्णय घेतलेला नाही व शिक्षण मंत्री अद्यापही बोलायला तयार नाही यासोबतच पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन अद्याप केले नसल्याने पालकांना व शाळांना माहिती देण्यात आली नाही , शाळांमधील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्याची प्रक्रीया अद्याप सुरू करण्यात आली नाही , विद्यार्थी संख्येअभावी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करण्यात येऊ नये असा शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आला नाही .कोविड १९ च्या कामासाठी शिक्षकांना चेकपोस्ट, राशन दुकाने, मद्य विक्रीच्या दुकानात गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांच्या उपस्थिती चे आदेश देऊन शिक्षकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रताप महाविकास आघाडीच्या सरकारने केला आहे. शिक्षक भरतीवर बंदी आणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून शिक्षकांची बेरोजगारी वाढविण्याचे शिक्षण विभागाचे षडयंत्र आहे , १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान थकबाकीसह तरतूद असूनही अध्याप शिक्षकांना देण्यात आले नाही , अपंग समावेशीत शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारक यांचे न्यायालयीन निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन तातडीने देण्याचे आदेश असूनही अद्याप देण्यात आले नाही, मागील सहा महिन्यात निवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने पेंशन सुरू करून इतर लाभ मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून शासन कोणताही निर्णय घेत नसल्याच्या विरोधात व शिक्षण मंत्री कुठलेही ठोस निर्णय घेत नाही म्हणून भाजप शिक्षक आघाडी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण बचाव आंदोलन पुकारण्यात आले असून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांना निषेधाचे निवेदन दिले जाणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.