Halloween party ideas 2015


अमळनेर : हतनूर धरणातून सोडलेल्या पहिल्या आवर्तनचे पाणी जळोद डोहापर्यंत पोहचवून तापी पात्र तुडुंब भरले आहे माजी आमदार साहेबराव पाटील व मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले शहराला उन्हाळ्यात आणि कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे
अमळनेर शहराला जळोद येथून तापी नदीवरून पाणी पुरवठा होत असतो जळोद डोह आटल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पहिले आवर्तन घेण्याची सूचना मुख्याधिकारीना दिली होती त्यानुसार नगरपालिकेने राखून ठेवलेल्या तीन आवर्तनापैकी एक आवर्तन घेण्यात आले गिरणा पाटबंधारे विभागाने 17 रोजी सायंकाळी 5 दशलक्ष घनमीटर पाणी अमळनेर साठी पाटचारीतून सोडले होते चार दिवसांनी 105 किमी प्रवास करून पाणी जळोद डोहापर्यंत पोहचल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी जलपूजन केले यावेळी प्रशासन अधिकारी संजय चौधरी , पाणीपुरवठा अभियंता हर्षल सोनवणे , बाबू साळुंखे , रवींद्र पाटील हजर होते
पहिल्या आवर्तनचे पाणी जून अखेरपर्यंत अमळनेरकरांना पुरणार आहे नागरिकांनी अंगणात सडा मारणे , वाहने धुणे यासाठी पाण्याचा अपव्यय न करता कोरोना पासून बचाव करण्यासाठी वारंवार साबणाने हात धुण्यासाठी , बाहेरून आल्यास अंघोळ करण्यासाठी पाणी वापरावे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे पाणी पुरवण्यात येईल असे आवाहन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केले आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.