कोरोनाचा संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून दि.22 मार्च पासून राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाली आहेत.राज्याच्या महिला व बालविभागातील अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या लाभार्थांचा आहार स्थगित करण्यात आला होता.असे असले तरी या लाभार्थ्यांना १५ मे पर्यंत गरम ताजा आहाराऐवजी कोरडा शिधा वाटप करण्याचे उद्दिष्ट महिला व बालविकास मंत्री मा.ना.अँड.श्रीमती यशोमती ठाकूर यांनी आखले आहे.कोरोनामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज अमरावती येथून श्रीमती ठाकूर यांनी राज्य मंत्री बच्चू कडू सोबत राज्यातील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आतापर्यंत ४० टक्के शिधा (टेक होम रेशन) लाभार्थ्यांना पुरवठा झाला असून येत्या १५ मे पर्यंत १००टक्के पुरवठा केला जाईल.लाभार्थ्यांना शिधा वाटप करतांना सोशियल डिस्टन्सींग ठेवले जात असून हँन्डग्लोजचाही वापर केला जात असून लाभार्थींच्या पालकांना अंगणवाडी केंद्रात बोलावून त्यांना शिधाची पँकेट वाटप केले जात असल्याचे सांगितले.या कॉन्फरन्समध्ये महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन,एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो,महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद,महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रद्धा जोशी,बाल हक्क आयोगाच्या सदस्य सचिव सिमा व्यास,महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा सहभागी झाले होते.