वाढवू शकतो कोरोनाचा प्रभाव !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) देशासह राज्यातील कोरोना विषाणूचा दैनंदिन वाढता फैलाव लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ, नागरी वस्ती, गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक स्वच्छता गृह इत्यादी ठिकाणी सद्या सर्वत्र कोरोना प्रतिबंधक फवारणी केली जात आहे. मात्र शहरातील ज्या ज्या ठिकाणी बैंकांनी आपल्या ग्राहकांच्या बैंक आर्थिक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शहरातील नाक्या नाक्यावर ठिकठिकाणी
एटीएम मशीनची व्यवस्था केली आहे. मात्र देशातील कोरोना विषाणूचा दैनंदिन वाढता प्रभाव लक्षात घेता प्रत्येक शहरातील बैंक एटीएम कक्षाच्या अंतर्बाह्य कार्यक्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव दिसून येतो आहे.
देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासा्ठी शासनाने संपूर्ण देशात सर्व ठिकाणी लाॅकडाऊन संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कायदेशीर निर्बंध आले आहेत.
कोरोना विषाणू निर्मुलन पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन कालावधीत नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वेळ निर्धारित केला आहे. त्या वेळेतच त्या शहरातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडली जातात दिलेली वेळ संपताच सर्व दुकाने बंद केली जातात. या कालावधीत नागरिकांना काही अत्यावश्यक वा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडून आपापल्या जवळच्या बाजारात जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी काहींना बैंकेत तर काहींना बैंक एटीएम मध्ये जाऊन आपल्या बैंक अकाऊंट मधून पैसे काढावे लागतात. अशा वेळी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बैंक मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ग्राहकांच्या हातावर हॅन्ड सॅनिटाइजर देऊन त्यांचे हात बैंक व्यवहारा पुर्वी निर्जंतुक केले जातात. मात्र जे ग्राहक पैसे काढण्यासाठी बैंक एटीएम सुविधांचा वापर करण्यासाठी बैंक एटीएम मध्ये जातात तिथे कोरोना प्रतिबंधक खबरदारी म्हणून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना आजही केलेल्या दिसून येत नाहीत. बैंक एटीएम मध्ये दिवसभरात हजारो ग्राहक त्या बैंक एटीएम सेवेचा लाभ घेत असताना त्या एटीएम मशीन स्क्रीनवर बोटांनी स्पर्श करून त्या मशीनला कमांड देत असतात. बैंक एटीएम कक्षाच्या दरवाज्याची हाताने उघडझाप करत असतात या बैंक एटीएम सेवेचा लाभ घेणार्या पैकी एखादी व्यक्ती जर कोरोना बाधीत असेल तर त्यामुळे इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. आणि त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढू शकते. असे होऊ नये म्हणून प्रत्येक बैंकने आपापल्या बैंक एटीएम कक्षाच्या अंतर्बाह्य कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
