Halloween party ideas 2015




कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ही कविता लिहिली आहे

आज मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाचा लागण झाली
म्हणून ही कविता लेखणीतून आली..


ज्याला कोणी नाही पाठीराखा
लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरत आहे
वाईट परिस्थितीशी झुंजणाऱ्या
पत्रकाराला सांगा? कोण मदत करत आहे...

बळीराजावर येवो अस्मानी'
मग येवो सुल्तानी संकट
इथे पत्रकार धावून मांडती
त्याची अवस्था बिकट
शेतकऱ्याच्या विदारक चित्राला
रंग तो भरत आहे
पत्रकाराला सांगा? कोण मदत करत आहे..

प्रसिद्धीची हाव असणारे
पुढारी त्यास जवळ करती
त्यांच्याविरोधात छापले की
 त्याच्यावरती डाव धरती
निर्भिड लिहिले की, त्याला दोषी धरत आहे
पत्रकाराला सांगा? कोण मदत करत आहे..

आज आला कोरोना , गरजूंसाठी
मदतीला सरसावले शेकडो हात
मग माझा, बांधव *(पत्रकार)
कोरोनाग्रस्त ..तो आहे संकटात
त्यास लाभली ना कुणाची साथ 
कुटुंबासाठी तो जीव मुठीत धरून मरत आहे
पत्रकाराला सांगा ? इथे कोण मदत करत आहे...


कवी
 *अजय भामरे  पत्रकार
     ८८३०३४३७३६

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.