Halloween party ideas 2015


कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मास्क मिळणार.

संघटनेने केलेल्या मागणीला यश....

अमळनेर प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरी व ग्रामीण भागात जनजागृती करणे, स्वच्छता व आरोग्याची काळजी घेणे, बाहेरून आलेल्या व्यक्तिंचा सर्व्हे करणे, वेळोवेळी हात धुणे,सोशियल डिस्टन्सींग पाळणे यासह अन्य प्रकारची कामे शासन आदेशानुसार अंगणवाडी कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून करत आहेत.असे असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी मास्क, सँनिटायझर, ग्लोज पुरविण्यात आले आहेत. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मास्क, सँनिटायझर, ग्लोज पुरविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. हि गंभीर बाब संघटनेने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मास्क, सँनिटायझर व ग्लोज पुरविण्यात यावेत. अशी मागणी दि.१५ एप्रिल रोजी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह शासनाने कडे निवेदनाद्वारे केली होती. सदर मागणीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती ज्योती पाटील यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सुमारे चार हजार वॉशेबल मास्क बचत गटांकडून तयार करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर.आर.तडवी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. सदर मास्क लवकरच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोहोच केले जातील असे संघटनेला सांगण्यात आले आहे.त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.संघटनेने केलेल्या मागणीला यश आले असूनअन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे रामकृष्ण बी.पाटील यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.