Halloween party ideas 2015


*मार्चचे वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्यास अखेर सुरुवात*

*भाजपा शिक्षक आघाडीकडून शिक्षण निरीक्षक, वेतन अधीक्षक-कर्मचारी, मुख्याध्यापक व लिपिकांचे आभार !*

मुंबई (प्रतिनिधी) मार्च महिन्याचे वेतन अखेर आज मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांची मार्च महिन्याची वेतन देयके ऑनलाईन प्रणालीने जमा झाली होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक राज्यसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा  शासनाने निर्णय घेतला त्यामुळे शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांची आधी पाठविलेली वेतन देयके रद्द झाली व नव्याने बिले पाठविण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले. लॉकडाऊन असल्याने शाळांमध्ये कसे पोहचायचे हा प्रश्न मुख्याध्यापक व लिपिकांना पडला होता अखेर शाळांमधील मुख्याध्यापक व लिपिक वर्गाने मेहनत घेऊन वर्क फ्रॉम होम केले. वेतन प्रणालीत वारंवार बिघाड होत होता याबाबत भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाशी संपर्क करून ऑनलाईन प्रणालीत सुधारणा करून आणली.
मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयातील वेतन अधीक्षक व त्यांचे कर्मचारी अथक मेहनत घेत होते शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर मिळावे यासाठी काल वांद्रे येथील कोषागारात शिक्षण निरीक्षक व वेतन अधीक्षक तसेच इतर कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी बिले जमा केली. याकामी अनेक शाळांमधील तंत्रस्नेही लिपिकांनी एकमेकांना सहकार्य करून वेतन देयके लवकर कसे जमा होतील यादृष्टीने लक्ष दिल्याने मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा होत असून मुंबईतील तीनही शिक्षण निरीक्षक, वेतन अधीक्षक व कर्मचारी तसेच शाळांचे मुख्याध्यापक व लिपिकांचे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी आभार मानले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.