Halloween party ideas 2015


*जळोद येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांनी दारू बनविण्याचे रसायन केले नष्ट*

जळोद-(ता-अमळनेर) अनेक वेळा सूचना देवूनही कोरोनाच्या संसर्गजन्य च्या काळात गावात दारू बंद ठेवा असा इशारा देऊनही न ऐकल्याने जळोद येथील सरपंच, सदस्य व पोलीस पाटील यांनी गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले
सरपंच डॉ जितेंद्र चौधरी यांच्या रिपोर्ट नुसार आमच्या गावात रोज सकाळ-संध्याकाळ बुधगाव, अनवर्दे, वाळकी येथून रोज शेकडो लोक दारू पिण्यासाठी येतात म्हणून कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त झाली आहे प्रशासन या बाबत काळजी घेत असताना देखील जळोद गाव मात्र त्याबाबतीत बेफिकीर असल्याचे लक्ष्यात आले म्हणून संतप्त झालेल्या पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी रसायने नष्ट केली
---------------------------------------------------
मी स्वतः अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला असता असता त्यांना आम्ही कल्पना दिली होती, की गावात गावठी दारू पाडणाऱ्यानी थैमान घातले आहे साहेबांनी दखल घेत, पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले असता साहेबांनी बिट हवालदार प्रभाकर पाटील यांना गावात चौकशी कामी पाठविले असता जळोदच्या बसस्थानक चौकात "आपले सरपंच दारू नसताना खोट्या तक्रारी करतात"असे सांगून निघून गेलेत
सरपंच
डॉ.जितेंद्र चौधरी

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.