अमळनेर-PTA
खाजगी कोचिंग क्लासेस संघटना(PTA )
अमळनेर तर्फे-गोशाळेच्या अन्नदान उपक्रमा
साठी रोख स्वरुपात मदत.
अमळनेर प्रतिनिधी-
आज देशात कोरानाच्या विषाणूने संपुर्ण देशात कहर केला आहे. लाँकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडले आहेत. अनेक तळागाळातील नागरिक दोन वेळच्या जेवणासाठी उपाशीपोटी असतात. अशा नागरिकांना मदत करणे आपले नैतिक जबाबदारी समजून एक माणुसकीचा हात पुढे करत खाजगी क्लासेस संघटनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे .यावेळी श्रीमती भानूबेन गोशाळेला रोख स्वरूपाची मदत करत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम केले आहे.
देश अत्यंत कठीण परिस्थितीतुन जात
आहे.लॉकडाऊन मुळे गोरगरीब जनतेचे
अत्यंत हाल आहेत.मोलमजुरी करून पोट
भरणाऱ्यांच्या हाताला कामच नाही...तर
पैसा कुठुन येणार? 'गोक्षेत्र प्रतिष्ठान' संचलित, श्रीमती भानूबेन गोशाळा,अमळनेर तर्फे-भुकेलेल्याला अन्न,तहानलेल्याला पाणी उपक्रमाला...आज शुक्रवार,दि.17 एप्रिल
रोजी खाजगी कोचिंग क्लासेस संघटना(PTA )अमळनेर तर्फे-रोख स्वरुपात मदत करण्यात
आली.पीटीए संघटनेचे व साई क्लासेचे संचालक भैय्यासाहेब मगर व त्यांच्या पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.