Halloween party ideas 2015


अमळनेरात कुठे आढळताय गावठी कोथऱ्या,तर कुठे इंग्रजी बनावट दारू

दारूविना कासावीस तळीरामानी फोडले परमिटरुम

अमळनेर-सकाळपासून रात्रीपर्यंत दारूच्याच धुंदीत असणाऱ्या तळीरामाची लॉक डाऊनच्या काळात भटकंती होत असली तरी अमळनेर सारख्या शहरात त्यांना महागाने का असेना पण दारू मिळत असल्याचे चित्र आहे,इंग्रजी शौकिनाना मात्र बनावट तथा विषारी दारूचा आस्वाद मिळत असून गावठी हातभट्टीच्या कोथऱ्या चक्क रस्त्यावर सांपडत आहेत.
अनेक मार्गांनी वेगवेगळ्या पद्धतीची दारू उपलब्ध होत असतानाही काही तळीरामानी दि 19 च्या रात्री चोपडा रोडवर श्रीकृष्ण पेट्रोलियम समोर असलेले हॉटेल भगवती हे परमिट रूम फोडून त्यातील दारूच्या बाटल्या 
लंपास केल्याची घटना घडली,सकाळी ही घटना उघडकीस आली,चोरत्यानी मागील बाजूने प्रवेश करून हा डल्ला मारला,यात प्रामुख्याने दारूच्या बाटल्या लंपास झाल्या असल्याने तळीरामानीच हा डल्ला मारला असावा असा अंदाज वाक्य होत आहे,तसेच काल दुपारी पालिकेचे अतिक्रमण पथक आणि सुरक्षा कमांडर हे बहादरपूर रोडवर गेले असता त्याठिकाणी बंद पोत्यामध्ये काहीतरी असल्याची माहिती महिलांनी दिली अतिक्रमण पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी ती पोतळी उघडून पहिली असता त्यात दारूच्या कोथऱ्या आढळून आल्या यामुळे जागेवरच या कोथऱ्या नष्ट करण्यात आल्या.अश्या कोथऱ्या शहरात अनेक ठिकाणी दिसत असल्याने जोरात गावठी हातभट्टी ची विक्री होत असल्याचे दिसत आहे.
तसेच अनेक ठिकाणी इंग्रजी दारू सर्रासपणे उपलब्ध होत असली तरी ही दारू बनावट आणि विषारी असल्याचा प्रत्यय अनेकांना आला असून यामुळे अनेकाना व्याधी निर्माण होऊन प्रतिकारशक्ती कमी होत आहे,प्रामुख्याने कोरोना पासून बचावासाठी प्रतिकारशक्ती शाबूत ठेवणे महत्वाचे असल्याने या बनावट दारूच्या नादी लागू नका असा सल्ला अनेक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.