शालेय शिक्षण आणि जीवन याचा खूप जवळचा संबंध आहे. जीवनातून शिक्षण घडते आणि जीवनाला आकार मिळतो. आधुनिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ घालताना मुलांना नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे. सुरुवातीपासून नैतिक मूल्ये मुलांमध्ये रूजविली पाहिजे.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक आणि मानसिक विकास होणे गरजेचे आहे. पुस्तकी शिक्षणाने त्यांच्या बौद्धिक विकास होईल. पण भावनिक व मानसिक विकासासाठी पुस्तकाबाहेरील शिक्षणाची आवश्यकता आहे. मुलांना संस्कारक्षम बनविणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.मुलांची मानसिकता आणि शिक्षणाचे महत्त्व या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे.
मुलांना शालेय अभ्यासाबरोबर सणवार, खेळ, शिस्त, मोठ्यांचा आदर यांतून विद्यार्थ्यांना आपल्या परंपरेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी नैतिक शिक्षण महत्त्वाचे आहे.प्रत्येक मूल हे इतर मुलांपेक्षा वेगळे असते. त्यांच्या जडणघडणीत अनेक घटकांचा समावेश असतो. त्यातील महत्त्वाचे घटक शाळा आणि पालक आहेत.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असल्याने मुलांना आजी-आजोबा आणि मोठ्या व्यक्तीचा सहवास मिळत होता. मूल्यशिक्षणाचे धडे ही त्यांच्याकडून मिळत असे. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कामाच्या निमित्ताने कुटुंब विभक्त झाली. आई-वडील दोन्ही नोकरदार असल्याने मुलांमध्ये एकटेपणा वाढला,संवाद कमी झाल्यामुळे मुलांमध्ये शेअरिंगची भावना कमी झाली. आताची मुले खूप हुशार आहेत. पण त्यांच्यावर भावनिक संस्कार झाले तर ते बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने तोंड देतील.
पूर्वीचे खेळ हे लुप्त होत चालले आहे. उदा.-विंटी-दांडू,लगोरी, टिपरी पाणी इ.या खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे त्यासाठी या खेळांना विशेष महत्त्व देणे आवश्यक आहे. आधुनिक व पारंपरिक खेळ,सामान्य ज्ञान यांची माहिती वि
पूर्वीचे खेळ हे लुप्त होत चालले आहे. उदा.-विंटी-दांडू,लगोरी, टिपरी पाणी इ.या खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे त्यासाठी या खेळांना विशेष महत्त्व देणे आवश्यक आहे. आधुनिक व पारंपरिक खेळ,सामान्य ज्ञान यांची माहिती विद्यार्थ्यांना असावी.
प्रत्येक विषयात विद्यार्थी एकसारखे नसतात. हल्ली मुलांना गणित, इंग्रजी, विज्ञान या सारख्या विषयात जास्त समस्या निर्माण होत असल्याने त्यांच्या मध्ये न्यूनगंड वाढतो. अशावेळी वेगवेगळ्या युक्त्या, गेम्सदवारे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन करुन देणे. त्यामुळे त्यांच्या मनात या विषयाची गोडी निर्माण होऊन आत्मविश्वास वाढले.
विद्यार्थी हा सर्वात जास्त वेळ शाळेत घालवतो. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबर मैदानी खेळातून त्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. यामुळे त्याची शारीरिक जडणघडण सुद्धा होईल. सध्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. जगभरात घडणाऱ्या घटना लगेच उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर नैतिक मूल्य शिकवली तर ते चांगले नागरिक बनवून देशाच्या विकासात हातभार लावतील.
-लेखिका
अमिता कदम.
ठाणे ( मुंबई )
मोबाईल : - +919819395788.
