Halloween party ideas 2015


*एप्रिल महिन्याच्या पगाराचे आदेश द्या*

*भाजपा शिक्षक आघाडीची राज्यशासनाकडे मागणी*

मुंबई (प्रतिनिधी) मार्च महिन्याच्या वेतनाचा दुसरा टप्पा व एप्रिल महिन्याच्या वेतनाचे आदेश वेतन अधीक्षकांना देण्यात यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्यशासनाकडे केली आहे
भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत राज्याचे वित्त सचिव, शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक यांना आज मेल करून मागणी केली आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात आर्थिक संकट कोसळले त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता राज्य सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे दोन टप्यात देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार ५० व ७५ टक्के वेतन मिळाले व उर्वरित टप्पा देण्याचे स्वतंत्र आदेश काढू असे निर्देश वित्त विभागाने सर्व शासकीय-निमशासकीय विभागांना दिले. कर्मचाऱ्यांनीही अशा परिस्थितीत शासनाला साथ दिली. यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांचे गृहकर्जाचे हप्ते थकले, बँकांनी वसुलीचा तगादा लावला. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी आर्थिक कसरत करीत शासनाला पूर्ण सहकार्य केले. आता पुन्हा एप्रिल चा तिसरा आठवडा सुरू झाला परंतू अद्यापही मार्चच्या वेतनाचा दुसरा टप्पा तसेच एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत कोणताही स्पष्ट आदेश नसल्यामुळे शाळांनी वेतनदेयके बनवून वेतन पथकाकडे पाठवायचे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच कमी वेतन मिळाल्याने आर्थिक नियोजन करतांना शिक्षक-शिक्षकेतरांची मोठी दमछाक झाली. आता एप्रिल महिन्याच्या वेतनाकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून शासनाने तातडीने स्पष्ट आदेश काढावेत अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक सचिन पांडे, सुभाष अंभोरे, बयाजी घेरडे व संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.