अमळनेर प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाँकडाऊन असल्याने अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी गरजू लोकांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत अमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील गरजू लोकांसाठी सर्वतोपरी सहकार्य करीत असताना जी रात्रंदिवस पोलीस अधिकारी कर्मचारी आपली सेवा देत आहे त्यांची विचारपूस करणे आपले नैतिक कर्तव्य समजून चोपडी कोंडावळ येथे रात्री भेट देऊन पोलीस कर्मचार्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील करीत असल्याचे दिसत आहे.
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे सेवा देताना दिसत आहे अडल्या नडल्यांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्य समजून ते नेहमीच पुढे असतात त्यांच्या उत्कृष्ट सहकार्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
