खान्देश माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष इंगळे यांची भारतीय जनता पक्षाच्या जळगांव उदयोग आघाडीच्या महानगराध्यक्षपदी निवड... .
खान्देश माळी महासंघाच्या वतीने अभिनंदन.
जळगांव प्रतिनिधी-
खान्देश माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, सन्माननीय भाऊसाहेब संतोषजी महिपत इंगळे साहेब यांची , भारतीय जनता पक्षाच्या जळगाव उद्योग आघाडीच्या महानगराध्यक्ष पदी एकमताने निवड झाली,
भाजपा जळगाव महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी व जळगाव महानगरीचे लोकप्रिय आमदार राजुमामा भोळे यांनी जो विश्वास दाखवला आहे ,त्यास संतोष इंगळे नक्कीच न्याय देतील,यात कुठलीही तिळमात्र शंका नाही. संतोषभाऊंचे कार्य करण्याची पद्धत ही प्रामाणिक , निस्वार्थी पणाची असते. भाऊसाहेब यांचं कार्य , समाजाप्रती, समाजप्रिय व महान आहे.मी स्वता या कार्याचा साक्षिदार आहे. आणि मित्रांनो पदे मिळतात, पण त्या पदाला यथोचित न्याय मिळवून देणारी माणसं खूपच कमी असतात. आमचे संतोष भाऊ इंगळे कुठलेही काम जीव ओतून करीत असतात ,याचा मला सार्थ अभिमान आहे
त्यांचे मनापासून अभिनंदन व भावीवाटचालीस शुभेच्छा!असे संस्थापक अध्यक्ष खान्देश माळी महासंघ जळगाव, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुरलीधर महाजन यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले.
