कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अंगणवाडी केंद्रातील गरोदर व स्तनदा माता, ०३ ते ०६ वर्षे वयोगटातील लाभार्थी यासह अन्य लाभार्थी पुरक पोषण आहारापासून वंचित राहून कुपोषण वाढू नये.म्हणून शासनाने सदर काळात अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांना सुरळीतपणे टेक होम रेशन (THR) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नंदुरबार तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना आहाराच्या पाकिटांचा (THR) नुकताच पुरवठा करण्यात आला आहे.आलेल्या THR च्या पाकीटांचे आज तालुक्यातील न्याहली येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक ०१ व ०२ मध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका हिराबाई माळी,रेखा माळी यांनी वाटप केला.आहाराचे पाकीटे वाटप करतांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासन निर्णयानुसार सोशियल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन केले.या कामात मदतनीस सिंधूबाई माळी,मनिषा माळी यांच्यासह गावातील ग्रामरक्षक दल आणि आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.