आज सर्व जग हे कोरोनाचा भीतीमुळे ठप्प झाले असल्याने सर्व भारतीय देखील आपापल्या घरात आहेत. कोणतेही सण तसेच महापुरुषांचा जयंत्या देखील एकत्र येऊन साजरी करता येत नाही त्यामुळे लोकमान्य विद्यालय,अमळनेर येथील तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन अनोख्या पद्धतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली आहे. यामध्ये भूषण महाले यांनी १४ एप्रिल २०२० भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनावर आधारित १० प्रश्नांची चाचणी तयार केली ही चाचणी सोडविण्यासाठी तीस मिनिटे एवढा वेळ देण्यात आला. तरी ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान १०४७ लोकांनी ही चाचणी सोडवली आहे. लवकरच सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र त्यांच्या वाॅट्सअॅप क्रमांकावर पाठवले जाणार असल्याचे भूषण महाले यांनी सांगितले.
